अभिनेता सनी देओल सध्या एका भावनिक व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अलीकडेच त्याला आई प्रकाश कौर यांचा हात धरून चालताना पाहण्यात आले असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर प्रथमच प्रकाश कौर सार्वजनिक ठिकाणी दिसल्या आहेत. धर्मेंद्र यांचे 2025 मध्ये निधन झाले होते.
इन्स्टंट बॉलिवूडने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सनी देओल अतिशय काळजीपूर्वक आपल्या आईचा हात धरून त्यांना कारपर्यंत घेऊन जाताना दिसत आहेत. आईला आधार देत, प्रेमाने त्यांची काळजी घेत असल्याचा हा क्षण पाहून चाहत्यांची मने जिंकली गेली आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांनी हार्ट इमोजींचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, सनी देओल (Sunny Deol)यांचा बहुचर्चित चित्रपट ‘बॉर्डर 2’ 23 जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. अनेक शहरांमध्ये सकाळी 7.30 आणि 8 वाजल्यापासून शो सुरू करण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे चित्रपटाचे कंटेंट उशिरा पोहोचल्याने शो उशिरा सुरू झाले.
फिल्म इन्फॉर्मेशनच्या अहवालानुसार, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत काही सिनेमागृहांमध्ये चित्रपट रिलीजसाठी पूर्णतः तयार नव्हता. यूएफओ मूव्हीजसारख्या डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड उशिरा सुरू झाल्यामुळे देशातील काही भागांमध्ये स्क्रीनिंगमध्ये विलंब झाला.
‘बॉर्डर 2’ हा यंदाच्या वर्षातील सर्वात मोठ्या हिंदी चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. निधी दत्ता आणि भूषण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रिलीजपूर्वीच चित्रपटाच्या जोरदार अॅडव्हान्स बुकिंगमुळे बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंगची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी सुरू झालेल्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ‘बॉर्डर 2’ ने तब्बल 12.50 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. सुमारे 275 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाची पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिस कामगिरी काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
ओटीटीवर या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी; इश्क, क्राइम आणि अॅक्शनच्या 9 कथा होणार रिलीज










