Wednesday, January 28, 2026
Home बॉलीवूड अरिजीत सिंह निवृत्ती: 12 वर्षांपूर्वीचं हिट गाणं “तुम ही हो” लाखो चाहत्यांच्या हृदयाची धडकन, यूट्यूबवर मिळाले 476 मिलियन व्ह्यूज

अरिजीत सिंह निवृत्ती: 12 वर्षांपूर्वीचं हिट गाणं “तुम ही हो” लाखो चाहत्यांच्या हृदयाची धडकन, यूट्यूबवर मिळाले 476 मिलियन व्ह्यूज

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गायक अरिजीत सिंहने अलीकडेच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अरिजीतने सांगितले की आता ते प्लेबॅक सिंगर म्हणून काम करणार नाहीत, म्हणजेच आता ते कोणत्याही चित्रपटासाठी गाणं रेकॉर्ड करणार नाहीत. या निर्णयामुळे त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये निराशा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करून या निर्णयामागची कारणं विचारली आहेत.

अरिजीत सिंहने (Arijit Singh)2005 साली फेम गुरुकुल या रियालिटी शोमध्ये कंटेस्टंट म्हणून आपला करिअर सुरू केला. त्यानंतर 2011 मध्ये इमरान हाश्मी आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर मर्डर 2 या चित्रपटातील “फिर मोहब्बत” या गाण्याद्वारे प्लेबॅक सिंगर म्हणून पदार्पण केले. या गाण्याने आणि त्यांच्या सुरेल आवाजाने अनेकांचे हृदय जिंकले.

पण त्यांना खरी सुपरस्टारची ओळख 2013 मध्ये आशिकी 2 या आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर रोमॅंटिक ड्रामाच्या सोलफुल हिट गाण्या “तुम ही हो” मुळे मिळाली. या गाण्याने त्यांना घराघरांत प्रसिद्ध केले. हे गाणं आजही प्रचंड लोकप्रिय आहे आणि 12 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या गाण्याला यूट्यूबवर 476 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या यशानंतर अरिजीतची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि त्यांच्या आवाजाने प्रेम, विरह, आनंद अशा प्रत्येक भावना व्यक्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग बनला.

अरिजीतने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत, ज्यात “चन्ना मेरेया”, “अगर तुम साथ हो”, “राब्ता”, “केसरिया”, “गेरुआ”, “ऐ दिल है मुश्किल”, “चलेया”, “फिर भी तुमको चाहूंगा”, “वे कमलेया”, “मुस्कुराने की वजह तुम हो”, “हवाएं”, “खैरियत” यांसारखी गाणी समाविष्ट आहेत.

गेल्या काही वर्षांत त्यांनी हिंदी सिनेमातील जवळजवळ सर्व प्रमुख सुपरस्टार्ससाठी गाणी गाऊन त्यांच्या आवाजाची जादू पसरवली आहे. या सुपरस्टार्समध्ये सलमान खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग यांचा समावेश आहे.अरिजीत सिंहने जागतिक पॉप स्टार्स टेलर स्विफ्ट आणि एड शीरनलाही मागे टाकत स्पॉटिफायवर 151 मिलियन फॉलोअर्ससह सर्वाधिक फॉलो केलेल्या कलाकारांचा मान मिळवला आहे. अरिजीतच्या प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्तीमुळे चाहत्यांमध्ये मोठा धक्का बसला आहे, तरी त्यांचे संगीत आणि आवाज नेहमीच चाहत्यांच्या हृदयात जिवंत राहतील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

बॉलिवूडमधील नेचुरल ब्यूटी कोण? आलिया, दीपिका, प्रियंकाला मागे टाकून फराह खानने घेतले या सुंदर अभिनेत्रीचे नाव

हे देखील वाचा