2023 साली प्रदर्शित झालेल्या ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. सुमारे 300 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. चित्रपटाच्या विषयामुळे सुरुवातीपासूनच मोठा वाद निर्माण झाला होता. सामाजिक, राजकीय आणि वैचारिक चर्चांमुळे हा सिनेमा सतत चर्चेत राहिला. मात्र सर्व वादांना मागे टाकत या चित्रपटाने दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफीसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
आता या यशस्वी चित्रपटाचा सीक्वल ‘द केरल स्टोरी 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनशाईन पिक्चर्सकडून 28 जानेवारी 2026 रोजी या चित्रपटाचा मोशन पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. मेकर्सनी यासोबतच चित्रपटाचा टीझर 30 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. पहिल्याच झलकितून यावेळीही प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी, वास्तवावर आधारित धक्कादायक कथा मांडली जाणार असल्याचे स्पष्ट होते.
‘द केरल स्टोरी 2: गोज बियॉन्ड’ या नावाने येणारा हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा अधिक गंभीर आणि खोलवर जाणारा असणार आहे. मोशन पोस्टरमध्ये भडक दृश्यांऐवजी महिलांच्या चेहऱ्यांवरील भीती, वेदना आणि असहाय्यतेचे भाव ठळकपणे दाखवण्यात आले आहेत. “कारण काही कथा कधीच संपत नाहीत” ही टॅगलाइन सत्य, द्वेष आणि मानवतेमधील संघर्ष अधोरेखित करते.
हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या भागात उल्का गुप्ता,(Ulka Gupta) ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया यांसारखे नवोदित कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी कामाख्या नारायण सिंह यांनी सांभाळली असून, चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. आशीन ए. शाह हे सह-निर्माते असून, एक सशक्त आणि क्रिएटिव्ह टीम या प्रकल्पामागे उभी आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘तुम्ही कलाकाराला मारत आहात’, अरिजीत सिंग अजूनही चित्रपट निर्मात्यांच्या या बोलण्यावर नाराज










