Saturday, January 31, 2026
Home साऊथ सिनेमा थरार आणि रहस्याचा धमाका: ‘वलथु वशथे कल्लन’ या चित्रपटांने IMDb रेटिंग 8.7 ने गाजवले

थरार आणि रहस्याचा धमाका: ‘वलथु वशथे कल्लन’ या चित्रपटांने IMDb रेटिंग 8.7 ने गाजवले

क्राइम थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतात, कारण ते प्रेक्षकांना थरार, रहस्य आणि सस्पेन्सने भरलेला अनुभव देतात. अशा चित्रपटांमधून मेंदूला कोडी सोडवण्याचे आव्हान मिळते, तसेच वास्तवात कोणताही धोका न पत्करता भावनांचा जबरदस्त प्रवास घडतो. सध्या अशीच एक नवी क्राइम थ्रिलर फिल्म प्रचंड चर्चेत आहे, जी कथा आणि रेटिंगच्या बाबतीत ‘दृश्यम’ आणि ‘महाराजा’सारख्या गाजलेल्या चित्रपटांना जोरदार टक्कर देत आहे.

आम्ही बोलत आहोत ‘दृश्यम’ (Drishyam)फेम दिग्दर्शक जीतू जोसेफ यांच्या नव्या चित्रपटाची — ‘वलथु वशथे कल्लन’. नुकतीच प्रदर्शित झालेली ही फिल्म प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरी उतरली असल्याचे दिसते.

काय आहे ‘वलथु वशथे कल्लन’ची कथा?

सॅम्युअल जोसेफ यांचे आयुष्य पूर्णपणे कोलमडते आणि तो एका महत्त्वाच्या तपासासाठी सर्कल इन्स्पेक्टर अँटनी झेवियर यांची मदत घेतो. वेळ संपण्यापूर्वी सत्य शोधण्याचे मोठे आव्हान अँटनीसमोर असते. चित्रपटातील प्रत्येक सीन सस्पेन्सने भरलेला असून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
विशेष म्हणजे, IMDb वर या चित्रपटाला 10 पैकी 8.7 रेटिंग मिळाली आहे. तुलनेत ‘दृश्यम’ला 8.4 तर ‘महाराजा’ला 8.3 रेटिंग मिळाली आहे.

बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात – बीजू मेनन आणि जोजू जॉर्ज यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही क्राइम थ्रिलर ‘दृश्यम 3’पूर्वीच बॉक्स ऑफिस आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार,

  • भारतात पहिल्या दिवशी नेट कमाई: 1.1 कोटी रुपये
  • ग्रॉस कमाई: 1.3 कोटी रुपये
  • जागतिक पातळीवर कमाई: 1.3 कोटी रुपये

या ओपनिंगवरून प्रेक्षकांचा आजही जीतू जोसेफ यांच्या कामावर असलेला विश्वास स्पष्ट होतो. फक्त त्यांच्या नावावरच प्रेक्षक थिएटरकडे आकर्षित होत असल्याचे दिसते.

‘वलथु वशथे कल्लन’ हा 2026 मधील भारतीय मल्याळम भाषेतील क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. दिग्दर्शन जीतू जोसेफ यांचे असून, कथा-दिग्दर्शन दीनू थॉमस एलान यांनी केले आहे. शाजी नदेसन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
मुख्य भूमिकेत बीजू मेनन आणि जोजू जॉर्ज झळकतात. त्यांच्यासोबत लीना, लिओना लिशॉय, शाजू श्रीधर, निरंजना अनूप आणि वैष्णवी राज सहायक भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

एकूणच, सस्पेन्स, रहस्य आणि दमदार अभिनय यांचा परिपूर्ण संगम असलेली ‘वलथु वशथे कल्लन’ ही क्राइम थ्रिलर चाहत्यांसाठी नक्कीच पाहण्यासारखी ठरत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘धुरंधर’च्या ओटीटी रिलीजनंतर आता ‘धुरंधर 2’च्या टीझरची उत्सुकता; या दिवशी कथेची पहिली झलक येण्याची शक्यता

हे देखील वाचा