Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘देवाचं इतकं करून तुमच्या मुलीच्या आयुष्यात असं का?’ यावर तेजश्रीच्या आईने दिलेलं उत्तर ऐकून नेटकरीही झाले प्रभावित

झी मराठीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत अभिनय करून अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरात पोहोचली. सर्वत्र तिला मालिकेतील ‘जान्हवी’ या नावानेच ओळखले जाऊ लागले. जान्हवी सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. फोटो व व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या पोस्टही सतत इंटरनेटवर व्हायरल होत असतात. आता पुन्हा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ तेजश्री प्रधानच्या एका फॅन पेजवर पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या आईविषयी बोलताना दिसत आहे. “तू इतकं देवाचं करतेस, मग तुझ्या मुलीच्या आयुष्यात असं का व्हावं?” असा प्रश्न तिच्या आईला विचारण्यात आला होता. यावर तिच्या आईने जे उत्तर दिले, ते ऐकून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल.

यावेळी बोलताना तेजश्री म्हणाली, “माझे आयुष्य कोणापासून लपलेलं नाही. जेव्हा मी माझ्या आयुष्यातील कठीण परिस्थितीतून जात होते, तेव्हा बरेच नातेवाईक माझ्या आईला म्हणायचे की, ‘काय गं, तू तर देवाचं इतकं करतेस, मग तुझ्या मुलीच्या आयुष्यात असं का व्हावं?’ पण त्यावेळी माझ्या आईने जे उत्तर दिलं, ते मला आयुष्यभर पुरणार आहे. ती खूप संयमाने नातेवाईकांना म्हणाली, तिच्या आयुष्यात जे घडतंय किंवा जे घडून गेलंय ते तिचं प्राक्तन आहे. ते कोणालाही बदलता येणार नाही. माझं दैवत किंवा कुठलाही देव जमिनीवर येऊन चल तुझं प्राक्तन बदलतो असं नाही म्हणू शकत. पण तिच्या वाटेला जे काही आलंय, त्याला सामोरं जाण्याची ताकद तिच्यात यावी, यासाठी मी देवाकडे नक्की प्रार्थना करेल.” असे तेजश्री या व्हिडिओत बोलताना दिसली. अभिनेत्रीच्या आईचे हे उत्तर ऐकून नेटकरी देखील त्यांचे कौतुक करत आहेत.

तेजश्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘झेंडा’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर बऱ्याच चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले. तिला खरी ओळख ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून मिळाली. याशिवाय ती ‘बबलू बॅचलर’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा