बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या पहिल्या पुण्यतिथीला आता 15 दिवस बाकी आहेत. सोशल मीडियावर सगळेजण त्याची खूप आठवण काढत आहे. बिग बॉस स्पर्धक अली गोनी आणि राहुल वैद्य यांनी त्याची आठवण काढली आहे.
अली गोनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून लिहिले आहे की, “सुशांत सिंगचा मृत्यू होऊन आता जवळपास एक वर्ष होत आले आहे, पण एक दिवसही असा नाही गेला ज्या दिवशी त्याच्या चाहत्यांनी त्याच्या नाव ट्विटरवर ट्रेंड केले नसेल. सुशांतने हे कमावले आहे.” तिथेच राहुल वैद्यला देखील सुशांतची खूप आठवण येत आहे.
सुशांत सिंगने मागच्या वर्षी 14 जूनला या जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे चाहते आणि नातेवाईकांनी त्याला आजही त्यांच्या आठवणीत जपून ठेवले आहे. त्याची पुण्यतिथी जवळ आली आहे, तर त्याच्या चाहत्यांची जखम पुन्हा भरली आहे. गायक राहुल वैद्यने देखील त्याची आठवण काढली आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करून लिहिले आहे की, “खूप दिवसांपासून काहीतरी सांगायचे होते. सुशांत भाई अमर रहो. तुझी नेहमीच आठवण येत राहील.” या सोबत त्याने हार्ट ईमोजी पोस्ट करून हॅशटॅग सुशांत सिंग राजपूत असे लिहिले आहे .
Bohot dinon se kuch kehna chahata tha.. Sushant bhai Amar Raho! Miss you.. always ❤️ #SushanthSinghRajput
— RAHUL VAIDYA RKV (@rahulvaidya23) May 28, 2021
नुकत्याच झालेल्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त सुशांत सिंगची बहीण श्वेता सिंग कीर्तीने एक पोस्ट करून सांगितले होते की, या जूनच्या पूर्ण महिन्यात ती तिच्या भावाच्या आठवणीसाठी एकांतात डोंगरात जाणार आहे.
राहुल वैद्य हा या दिवसात केपटाऊनमध्ये ‘खतरों के खिलाडी’ या शोची शूटिंग करत आहे. त्याचे एक गाणे ‘अली’ हे देखील प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला अली गोनी आणि राखी सावंत यांनी मिळून लिहिले आहे. बिग बॉसच्या घरात असतानाच त्यांनी या गाण्याबाबत विचार केला होता. या गाण्याला अली गोनी आणि जॅस्मिन भसीन यांच्या लव्हस्टोरीवर बनवले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…