Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड रविना टंडनने शेतात काम करतानाचा व्हिडिओ केला शेअर; युजर्स म्हणाले, ‘नाटक करतेय…’

रविना टंडनने शेतात काम करतानाचा व्हिडिओ केला शेअर; युजर्स म्हणाले, ‘नाटक करतेय…’

बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन ही इतर अभिनेत्रींप्रमाणेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती देखील तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा सोशल मीडियावर करत असते. ९०च्या दशकात आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही अभिनेत्री आजही तेवढीच प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. या दिवसात रविनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

रविना टंडनचा शेतात काम करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरंतर कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन चालू आहे. त्यामुळे ती सध्या तिच्या फार्म हाऊसवर राहायला गेली आहे. तिने शेतात काम करतानाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या व्हिडिओला खूप प्रतिसाद येताना दिसत आहे. लॉकडाऊनचा फटका बॉलिवूड सृष्टीला देखील बसला आहे. कोरोनाचा प्रभाव वाढल्याने पूर्ण राज्यातील शूटिंगवर बंदी आली आहे. अनेक शूटिंग बंद आहेत तर काही शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे कलाकारांचेही खूप नुकसान झाले आहे.

रविना एका गावामध्ये शेतात काम करताना दिसत आहे. या आधी देखील तिने असाच एक व्हिडिओ शेअर केला होता. पण तिला चाहत्यांनी खूप ट्रोल केले होते. तिच्या चाहत्यांनी तिला विचारले होते की, “तू खरचं शेतात काम केले आहेस का ? की फक्त फोटो काढण्यासाठी पोझ दिली आहे?” या नंतर तिने शेतात काम करताना व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रविना हातात फावडे घेऊन काम करताना दिसत आहे. काम करताना मात्र तिने कोरोनाचे नियम पाळले आहेत. तिने काम करताना देखील मास्क परिधान केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “मी खरंच शेतात काम केले आहे. ज्यावेळी मी काम करत होते तेव्हा हा व्हिडिओ शूट होतोय हे मला माहीतही नव्हते. पण आता तुमचा विश्वास बसत नाही म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केला आहे.”

रविना टंडनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमधे काम केले आहे. यामध्ये ‘अंदाज अपना अपना’, ‘दिलवाले’, ‘मोहरा’, ‘दुल्हे राजा’, ‘केगीएफ चॅप्टर १’, ‘लाडला’, ‘जिद्दी’, ‘तकदिर वाला’ यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा