Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘ए तिकडे बघते, मग काढ’, गायत्री दातारचा कँडिड फोटो घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ

‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतून ईशा या पात्राने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. ती इतरांप्रमाणेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. या मालिकेनंतर तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या मालिकेत साध्या वेशात दिसणारी गायत्री नेहमीच हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटो इतकेच कॅप्शन देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

गायत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाल रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. तसेच तिने ज्वेलरी परिधान केली आहे. तिचा हा एक कँडिड फोटो आहे. या फोटोमध्ये ती खूपच गोड दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “ए तिकडे बघते, मग काढ वाला कँडिड फोटो.”

तिच्या या फोटोचे कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचा फोटो देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. सगळेजण तिला कमेंट करून तिच्या सौंदर्याचा कौतुक करत आहेत. अनेक कलाकार देखील तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. तिच्या या फोटोवर राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावणी रवींद्र हिने कमेंट केली आहे की, “सुंदरी.”

गायत्री ही सध्या महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’मध्ये काम करत आहे. यामध्ये ती प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज आहे. या आधी ती झी मराठी वरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिच्या सोबत सुबोध भावे हे मुख्य भूमिकेत होते. तसेच अभिनेत्री गार्गी फुले ही तिच्या आईची भूमिकेत होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा