राजपाल हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे या अभिनेताने सिनेमा सृष्टीमध्ये त्याच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तसेच त्याने अनेक मालीका ही केल्या आहेत ज्या प्रचंड गाजले आहेत. मात्र तो ह्या वर्षी तो एका कारणामुळे प्रचंड चर्चेत आला ते म्हणजे फेब्रुवारीमध्ये, चेक बाऊन्सिंग प्रकरणात आत्मसमर्पण केले. आणि नंतर त्याला न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करण्यापूर्वी सुमारे 12 दिवस तिहार तुरुंगात घालवले. आणि नंतर त्याला जामिनावर मंजुरी देण्यात आली होती. अलीकडेच फराह खानच्या यूट्यूब चॅनलवर पाहुणा म्हणून आला होता. मुलाखतीदरम्यान, त्याने पहिल्यांदाच आपल्या कारकिर्दीबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले आहे.
जेव्हा राजपालला फराहने विचारले की तुरुंगात त्याचे चाहते आहेत का, तेव्हा राजपाल म्हणाला, “तिथे माझे चाहते नाहीत, पण एक व्यवस्था, एक कायदा आणि शिस्त आहे. त्यापेक्षा कोणीही मोठे नाही.” जेव्हा फराहने विचारले की त्याला परिस्थितीबद्दल राग आहे का, तेव्हा यादवने उत्तर दिले, “नाही, मी प्रत्येक परिस्थितीत जगायला शिकलो आहे. याव्यतिरिक्त, तुरुंगात काही कर्तव्ये पार पाडली का, असे विचारले असता, अभिनेता म्हणाला, “तशी परिस्थिती उद्भवली नाही, पण आम्हाला योग्य शिस्तीसह तिथे राहण्याची परवानगी होती. त्यामुळे आम्हाला तिथे राहून आमचा वेळ व्यवस्थित घालवावा लागला.
तर आता राजपाल (rajpaal)यादव हा भुत बंगला मध्ये दिसणार आहे. तर या मुलाखती दरम्यान राजपालने त्याच्या कठीण काळात त्याला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आणि सेलिब्रिटींचेही आभार मानले. सोशल त्याच्याबद्दल पोस्ट करणाऱ्या आणि त्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाचा तो आभारी असल्याचे त्याने सांगितले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची एकूण संपत्ती किती ? जाणून घ्या सविस्तर










