आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आदित्य धर दिग्दर्शक हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना आवडला आहे तरी यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिले आहेत.
धुरंदर 2 या चित्रपटाने आतापर्यंत उत्तम कमाई करत अनेक मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. जे चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केले आहेत आणि प्रेक्षकांच्या मनात भर निर्माण केले आहेत अशा चित्रपटांना या चित्रपटाने अगदी कमी कालावधीत कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. ‘धुरंधर 2’ ने 1500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, हा पराक्रम करणारा तो चौथा भारतीय चित्रपट ठरला आहे. ‘धुरंधर 2’ च्या आधी, केवळ आमिर (amir)खानचा ‘दंगल’, प्रभास आणि राजामौली यांचा ‘बाहुबली 2’ आणि अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ यांनीच हा टप्पा ओलांडला होता.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार धुरंदर 2ने प्रदर्शनाच्या 16 व्या दिवशी, ‘धुरंधर 2’ च्या कमाईत गुरुवारच्या तुलनेत 17.8% वाढ दिसून आली. या चित्रपटाने 13,330 शोजमधून 21.55 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे भारतातील त्याचे एकूण गहन कलेक्शन 1,148 कोटी रुपये आणि एकूण निव्वळ कलेक्शन 956.37 कोटी रुपये झाले आहे. परदेशातील 5 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह, एकूण परदेशी गहन कलेक्शन 375 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, ज्यामुळे जगभरातील गहन कलेक्शन 1,523.58 कोटी रुपये झाले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
जेलमध्ये काय करत होते राजपाल यादव? फराह खानशी संवाद साधताना आठवणींनी झाले भावूक










