Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

आमचा खरा देव… ‘या’ गावातील लोकांनी चक्क सोनू सूदचं बांधलं मंदिर, पुतळ्याची दररोज होते पुजाअर्चा

आपल्या देशात चाहते कलाकारांसाठी काय करतील याचा काही नेम नाही. आपल्या आवडत्या अभिनेत्याचा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर त्याच्या पहिल्याच शोचं तिकीट कसं मिळवता येईल यासाठी नाना कल्पृक्त्या लढवल्या जातात.

उदाहरण द्यायचं झालं तर दाक्षिणात्य सुपरस्टार  रजनीकांत यांचा एखादा सिनेमा प्रदर्शीत होणार असेल, तर प्रेक्षक अक्षरशः कामाला देखील दांडी मारायला मागेपुढे पाहत नाहीत.  काहींनी तर रजनीकांत यांचं थेट मंदिरच बनवलं आहे. ज्यात देवाच्या ठिकाणी रजनीकांत यांची प्रतिकृती आहे.

Sonu Sood
Sonu Sood

असा हा प्रेमाचा, भक्तीचा महापूर फक्त आपल्याला आपल्याच देशात पाहायला मिळू शकतो. अलिकडेच सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याच्याबाबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे.

सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याचं नाव यावर्षीच्या लॉकडाऊनपासून तर खेड्यापाड्यातल्या घराघरात पोहोचलेलं आहे. खरं तर याला कारणीभूतही स्वतः तोच आहे, म्हणजेच त्याचं कार्य आहे.

कोरोना काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीत जिथे लोकांना त्यांच्या गावी जाण्याकरिता काही पर्याय सापडत नव्हता, तेव्हा सोनूने स्वतःच्या काही मालमत्ता गहाण ठेऊन पैसे उभे केले आणि या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यात मदत केली.

याव्यतिरिक्त त्यांने काही गरीब मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला. इतकंच नाही तर घरातल्या कर्त्या सदस्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी देखील सोनूने स्विकारली. इतकी चांगली कामे केल्यानंतर सोनूच्या चाहत्यांकडून त्याच्याकरिता काही तरी हटके केल्याच्या बातम्या तर येणारच!

आपल्याला माहिती आहेच की सोनूने फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही भरपूर नाव कमावलं आहे. आणि त्याचे असंख्य चाहते त्याच्यावर एखाद्या भक्तासारखं प्रेम करतात.

याच वेड्या प्रेमापायी तेलंगणामधील एका गावामध्ये सोनू सूदचं चक्क मंदिर उभारण्यात आलं आहे. तेलंगणामधील डुब्बा टांडा गावातील गावकऱ्यांनी सिद्दीपेट जिल्हा प्रशासनाच्या मदतीने गावात सोनू सुदचं मंदिर उभारलं आहे.

एखाद्या कलाकाराचं मंदिर बनवले जाणे ही काही नवीन बाब नाही, किंबहूना सोनू सूद हा काही पहिला अभिनेता नाही. याआधीही अभिनेते रजनीकांत यांचे मंदिर कर्नाटकमध्ये तर महानायक अमिताभ बच्चन यांचं मंदिर कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये आहे. यांच्याव्यतिरिक्त एकेकाळच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी यांचे मंदिर आंध्रप्रदेश येथे उभारण्यात आले आहे.

Photo Courtesy: Twitter/SonuSood

सोनुने आतापर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीत कुंग फु योगा, हॅप्पी न्यु इयर, अरुंधती, सिंबा, रमैय्या वस्तावैय्या, शूट आउट ऍट वडाळा, एंटरटेनमेंट या आणि अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या अष्टपैलू अभिनयाची जादू प्रेक्षकांवर पसरवली आहे.

हे देखील वाचा