Tuesday, April 7, 2026
Home टेलिव्हिजन ‘जय श्री कृष्णा’ या मालिकेतील गोलमटोल कान्हा आठवतोय? ३ वर्षांच्या या चाइल्ड आर्टिस्टने जिंकली होती लाखोंची मने

‘जय श्री कृष्णा’ या मालिकेतील गोलमटोल कान्हा आठवतोय? ३ वर्षांच्या या चाइल्ड आर्टिस्टने जिंकली होती लाखोंची मने

टेलिव्हिजन विषयामध्ये अशा अनेक मालिका आहे ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. अन त्यातले त्यात रामायण आणि महाभारत या सारख्या मालिकाना तर प्रेक्षकांनी प्रेम दिले आहे. तर महभारत ही मालिका गाजलीच सोबत त्यातील अनेक कलाकार गाजले. तर यासारखीच ‘जय श्री कृष्णा’ ही मालिका यातील भगवान श्रीकृष्णाच्या पात्राने प्रेक्षकांना सातत्याने भुरळ घातली आहे. नितीश भारद्वाज यांच्या शांत हास्यापासून ते सौरभ राज जैन यांच्या भारदस्त अभिनयापर्यंत, अनेक कलाकारांनी ही दैवी भूमिका जिवंत केली आहे. तरीही, या सर्वांमध्ये एक बालकलाकार आजही चाहत्यांच्या हृदयात घर करून आहे एक छोटासा ‘कान्हा’, जिने आपल्या निरागसतेने आणि मोहकतेने संपूर्ण देशाची मने जिंकली. ही कथा आहे त्या छोट्या कृष्णाची जिने प्रत्येक घराघरात आपली एक खास ओळख निर्माण केली.

‘जय श्री कृष्णा’ ही मालिका 2008 मध्ये कलर्स टीव्ही’वर प्रसारित झाली होती. तर यामध्ये कृष्णाची भुमिका साकारलेल्या तीन वर्षांची एक चिमुकलीने प्रेक्षकांना सातत्याने भुरळ घातली आहे. तर हि भुमिका धृती भाटिया (bhatiya)हिने साकारली होती. या मालीकेत सुमारे 285 भागांपर्यंत चाललेल्या या मालिकेत, कृष्णाचे बालपण लोणी चोरण्यापासून ते ‘कालिया मर्दना’पर्यंत अतिशय सुंदरपणे चित्रित करण्यात आले होते.

आज धृती 17 वर्षांची झाली आहे. या मालिकेनंतर ती ‘इस प्यार को क्या नाम दूं’ आणि ‘फनाह’ या मालिकांमध्येही दिसली, परंतु ‘बाल कृष्णा’ म्हणून तिची ओळख आजही तितकीच अविस्मरणीयआहे. 2015 नंतर, तिने अभिनयापासून काहीशी फारकत घेतली आणि आपले लक्ष पूर्णपणे अभ्यासावर केंद्रित केले. तर तिने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अक्षय कुमारने एकता कपूरला पैसे दिले होते परत; निर्मात्यांनी केला खुलासा

हे देखील वाचा