Wednesday, April 8, 2026
Home बॉलीवूड ‘Scam 1992’ फेम हिरो आणि यामीची जबरदस्त केमिस्ट्री, नेटफ्लिक्सवर पाहा हा धमाल कॉमेडी चित्रपट

‘Scam 1992’ फेम हिरो आणि यामीची जबरदस्त केमिस्ट्री, नेटफ्लिक्सवर पाहा हा धमाल कॉमेडी चित्रपट

यामी गौतम ही एक लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री आहे. यामी गौतमीने उत्तम चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. तसेच ती तिच्या उत्तम चित्रपटामुळे चर्चेत असते तर नुकतेच तिने धुरंदर टू मध्ये काम केले त्यामुळे ती चर्चेत होती. ‘धुरंधर 2’ मध्ये यामीने एका लहान नर्सची छोटी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ‘स्कॅम 1992’ चा स्टार प्रतीक गांधी यामीसोबत दिसला. या विनोदी चित्रपटात दोघांनी खूप धमाल केली. या चित्रपटाचे नाव ‘धूम धाम’ असून तो नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

यामी  (yami)गौतम अभिनीत या धूम धाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषभ सेठ यांनी केले आहे. यात प्रतीक आणि यामीसोबत पवित्रा सरकार मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा वीर पोद्दार म्हणजेच प्रतीक गांधी याच्याभोवती फिरते, जो कोयल चड्ढा म्हणजेच यामी गौतम हिच्याशी लग्न करणार असतो. लग्नाआधी ते एकमेकांना ओळखत नसतात पण नंतर त्यांची ओळख होते. त्यांच्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी, काही गुंड नवविवाहित जोडप्याच्या घरात घुसतात आणि चार्लीची मागणी करतात. आणि पुढे ही कहाणी अनेक गमतीशीर पद्धतीने वळण घेते.

‘धूम धाम’ हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. तसेच यात ‘स्कॅम 1992’ या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळवलेल्या प्रतीक गांधीने विनोदी छटा आणली होती. गांधीने यापूर्वी ‘स्कॅम 1992’ या मालिणकेत उत्कृष्ट अभिनय करून बरीच प्रशंसा मिळवली होती. ‘धूम धाम’मधील प्रतीकचा विनोदी अभिनय आणि यामी गौतमसोबतची त्याची जोडी हिट ठरली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानची आई परवीन खान यांचे दीर्घ आजाराने निधन..!

हे देखील वाचा