बॉलिवूडसाठी मागील एक वर्ष आणि आता सुरू असलेले हे वर्ष दु:खाचेच आहे, असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. कारण मागील एक वर्षांपासून लागलेल्या कोरोना व्हायरसच्या काळात या रोगाने असो किंवा इतर काही आजारांमुले बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार दगावले आहेत. सतत कोणता तरी कलाकार या जगाचा निरोप घेताना दिसत आहे. आता बॉलिवूडमधून आणखी एक दु:खद वृत्त समोर येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांचे वडील दीपक सुबोध मेहता यांचे निधन झाले आहे. चित्रपट निर्माते हंसल यांनी सोशल मीडियामार्फत आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांचे निधन कशामुळे झाले, याचे कारण मात्र त्यांनी सांगितले नाही.
निर्मात्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर आपल्या वडिलांचा एक फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी आपल्या वडिलांना अलविदा म्हटले आहे.
I always thought he would outlive me. I was wrong. See you on the other side Pappa. The most handsome man in the world. And the most gentle and generous human being that I’ve ever met. Thank you Pappa for your unconditional love. Thank you my legend, my hero. pic.twitter.com/JkISj0mrKA
— Hansal Mehta (@mehtahansal) June 1, 2021
वडिलांसोबतचा फोटो शेअर करत हंसल मेहतांनी लिहिले की, “मी नेहमीच विचार केला होता की, ते माझ्यापासून पुढे निघून जातील. मात्र, मी चुकीचा होतो. दुसरीकडे भेटुया बाबा. जगातील सर्वात देखणा व्यक्ती आणि सर्वात कोमल तसेच उदार व्यक्ती, ज्याला मी भेटलो आहे. तुम्ही कोणत्याही अटीशिवाय केलेल्या प्रेमासाठी धन्यवाद बाबा. धन्यवाद माझे लिजंड, माझे हिरो.”
निर्मात्यांच्या या पोस्टवर अनेक युजर्स कमेंट करून त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहत आहेत. अनेक कलाकारही हंसल मेहता यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत आहेत. नुकतेच हंसल मेहता आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या तावडीत सापडले होते. हंसल मेहता यांनीच या गोष्टीची माहिती दिली होती. सोबतच आपल्या मुलाच्या मदतीसाठीही त्यांनी आवाहन केले होते.
हंसल मेहता यांनी ‘अलिगढ़’, ‘शहीद’, ‘छलांग’, ‘द ऍक्सिडेन्शल प्राईम मिनिस्टर’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…