Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

आहा! ‘धक धक गर्ल’च्या निळ्या लेहंग्यातील फोटोंचा इंटरनेटवर राडा; कमेंट बॉक्समध्ये बांधले जातायेत कौतुकांचे पूल!

बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित एक अशी अभिनेत्री आहे, जिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आजही उत्सुक असतात. माधुरी ही केवळ एक अभिनेत्रीच नाही तर हिंदी सिनेमाची डान्सिंग दिवा देखील आहे. तिच्या हिंदी चित्रपट कारकिर्दीत तिने अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले, जे आजही प्रेक्षक मोठ्या उत्साहाने पाहतात. माधुरीच्या अदांचा प्रत्येकजण वेडा आहे.

अवघ्या ८० व ९०च्या दशकापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी माधुरी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. दररोज फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचा चाहतावर्ग मोठा असल्याने, फोटो पोस्ट होताच व्हायरल होऊ लागतात. तिने नुकतेच शेअर केलेले फोटो देखील प्रचंड व्हायरल होत आहेत.

माधुरीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंने चाहत्यांना पुरते वेडे करून सोडले आहे. कारण हे फोटो आहेच तितके सुंदर! या फोटोमध्ये माधुरीने निळ्या रंगाचा प्रिंटेड लेहंगा परिधान केला आहे. हेअर स्टाईलबद्दल बोलायचे झाले, तर तिने एक वेणी घातली आहे. सोबतच घातलेले दागिने तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.

या फोटोवर अगदी कमी वेळातच लाईक्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे. सोबत नेटकरी फोटोखाली कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

माधुरी दीक्षित आजकाल तिच्या वेब सीरिज ‘फाइंडिंग अनामिका’ विषयी चर्चेत आहे. या मालिकेद्वारे ती ओटीटीमध्ये पदार्पण करत आहे. ही वेब सीरिज एक सस्पेन्स फॅमिली ड्रामा सिरीज आहे. यात माधुरी दीक्षितसोबत संजय कपूर, मानव कौल हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा