दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री नम्रता शिरोडकर ही देखील इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाच्या आठवणी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. व्यावसायिक आयुष्याबाबत ती जेवढी माहिती देत असते तेवढीच माहिती ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत तिच्या चाहत्यांना देत असते. तिच्या कुटुंबातील अनेक घटना ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच नम्रताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नम्रता शिरोडकरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, महेश बाबू हा एका खुर्चीवर बसलेला आहे. तसेच मुलगी सितारा त्याच्या मांडीवर बसलेली आहे, ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली आहे. त्यांचा हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “एकमेकांच्या कवेत सकाळ होणं गरजेचं आहे, नाहीतर आम्ही उठू शकत नाही.” त्यांचा हा रोमँटिक फोटो पाहून त्यांचे चाहते खूप खुश झाले आहेत. चाहते या फोटोला लाईक्स आणि कमेंट करून आपापली प्रतिक्रिया देत आहेत.
नम्रताने या आधी देखील तिच्या कुटुंबासोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. ती तिचा मुलगा गौतम आणि मुलगी सितारा यांच्यासोबत अनेक फोटो शेअर करत असते. तिच्या कुटुंबाला देखील तिच्या चाहत्यांनी खूप प्रेम दिले आहे.
महेश बाबू प्रमाणे नम्रता देखील एक प्रसिद्ध नायिका आहे. तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. तिने बॉलिवूडमध्ये ‘कच्चे धागे’, ‘वास्तव’, ‘अस्तित्व’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘हेराफेरी’, ‘तेरा मेरा साथ रहे’, ‘अलबेला’ या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…