कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे देशात पुन्हा लॉकडाऊन सुरु केला आहे. या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद असल्याने १० वी आणि १२ वी वीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा कशा घेणार हा मोठा प्रश्न सरकारसमोर होता. महाराष्ट्रामध्ये तर ठाकरे सरकारकडून १० वीच्या आणि १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या.
मात्र, प्रश्न होता CBSC आणि CISCE १२ वी बोर्डाच्या परीक्षांचा. अशात केंद्र सरकारने देखील १२ वीच्या CBSC आणि CISCE परीक्षा देखील रद्द केल्याची घोषणा करत विद्यार्थ्यांच्या मनातील मोठ्या प्रश्नाला अखेर उत्तर मिळाले आहे. सरकारचा हा निर्णय ऐकून मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील आनंद झाला आहे. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे अशनूर कौर. अशनूरने तिचा हा आनंद सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केला आहे.
अशनूरने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये ती बर्फाच्या डोंगरांमध्ये एका मोठ्या दगडावर बसून विक्ट्रीचे साईन दाखवत आहे, तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ती आनंदाने उडी मारताना दिसत आहे. हे दोन फोटो पोस्ट करताना अशनूरने लिहिले की, “१२ वीच्या विद्यार्थ्यांना माझ्या या मुडचे कारण नक्कीच लक्षात आले असेल.” अशनूरच्या या पोस्टवर तिच्या फॅन्सकडून अनेक कमेंट्स आणि लाईक्स येत आहे.
अशनूरने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. तिने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अशनूरने अगदी कमी वयातच तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘झांसी की रानी’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘ना बोले तुम ना मैंने कुछ कहा’ आदी मालिकांमधून अशनूरने अभिनयाची छाप सोडली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










