Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड अरर! शाहरुख खानसोबत काजोल चालवत होती सायकल अन् धपकन पडली तोंडावर; व्हिडिओ होतोय व्हायरल

अरर! शाहरुख खानसोबत काजोल चालवत होती सायकल अन् धपकन पडली तोंडावर; व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय रोमँटिक जोडींपैकी एक म्हणजे शाहरुख खान आणि काजोल. त्या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. आता देखील प्रेक्षक त्यांना एकत्र बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 90 च्या दशकात त्यांच्या जोडीने अक्षरशः सर्व प्रेमवीरांना वेड लावले होते. त्यांचा रोमँटिक अंदाज सर्वांनाच आवडत होता. अशातच त्यांच्या चित्रपटातील एक थ्रो बॅक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

काजोलने त्यांच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्या सीनमध्ये काजोल आणि शाहरुख सायकल चालवताना दिसत आहे. यावेळी काजोलची सायकल शाहरुखच्या सायकलला धडकते आणि ती खाली पडते. त्यांचा हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “सर्वांना हॅप्पी सायकल डे.” या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, काजोल शाहरुखपेक्षा वेगाने सायकल चालवताना दिसते. परंतु यातच तिचे संतुलन बिघडते आणि ती धपकन तोंडावर आपटते.

तिच्या या व्हिडिओवर कारण जोहरने कमेंट केली आहे की, “ओह गॉड, यांनतर काय घडलं होतं, हे मला खूप चांगल आठवत आहे. मी ते देखील कधीच विसरू शकत नाही.”

याआधीही काजोल आणि शाहरुख खानचा एका जुना डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते दोघे सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो ‘या गाण्यावर डान्स करताना दिसत होते. या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत वरुण धवन आणि क्रिती सेनन देखील होती. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे, जेव्हा या सगळ्या कलाकारांनी 2015 साली आलेल्या ‘दिलवाले’ या चित्रपटात एकत्र काम केले होते, तेव्हा शूटिंग दरम्यान काढलेला हा व्हिडिओ होता.

शाहरुख खान आणि काजोलने बॉलिवूडमध्ये सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. यात ‘कुछ कुछ होता है’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘बाजीगर’, ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा