Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘सिद्धू’ची लाडकी इरा झाली सहा वर्षांची; अभिनेत्याने खास पोस्ट शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सिद्धार्थ जाधव मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सर्वांत प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. व्यावसायिक दृष्टीने तो एक चांगला कलाकार आहेच, तर वैयक्तिकरित्या देखील तो एक चांगला पती व वडील आहे. सिद्धार्थ त्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. त्याच्या कुटुंबात पत्नी तृप्ती जाधव आणि त्याच्या दोन गोंडस मुली स्वरा आणि इरा आहेत. तो बऱ्याचदा त्याच्या कुटुंबियांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

आज म्हणजेच रविवारी (६ जून) इरा सहा वर्षांची झाली आहे. या निमित्ताने सिद्धार्थने अतिशय गोड अंदाजात आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुलगी इराचे गोड फोटो शेअर केले आहेत. यासोबतच गोड असे कॅप्शनही त्याने लिहिले आहे.

इरा जाधवचे काही फोटो शेअर करत सिद्धार्थने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “जून महिना स्पेशल असण्याचं अजून एक सुंदर कारण…इराचा वाढदिवस….६ वर्ष पूर्ण… तूझ्यातली उर्जा… तूझा आत्मविश्वास  आणि निरागसता अशीच कायम राहो आणि धिंगाणा, मज्जा, मस्ती करायला तर बाबा नेहमी तयारच आहे. तुझ्यावर कायम प्रेम करत राहिन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.” या फोटोला त्याच्या चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. सोबतच नेटकरी इराला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत आहेत.

सिद्धार्थ अलीकडेच प्रभूदेवाच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या, ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’मध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसला. या चित्रपटात सलमान खान आणि दिशा पाटणी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. सिध्दार्थने ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘दे धक्का’, ‘हुप्पा हुइया’, ‘टाइम प्लीज’, ‘धुरळा’ इत्यादी चित्रपटात अभिनय करून, प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्येही ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिटी ऑफ गोल्ड’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा