Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘खामोशी की तरह मै…’, म्हणत मराठमोळ्या श्रुती मराठेचं लेटेस्ट फोटोशूट आलं चर्चेत; सुंदरतेवर पुन्हा भाळले चाहते

मराठी चित्रपटसृष्टीत असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी मराठी व्यतिरिक्त इतर भाषिक चित्रपटांमध्ये काम करून आपले नाव कमावले आहे. यापैकीच एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे श्रुती मराठे. तिने अभिनयासोबतच अदांनी देखील चाहत्यांना वेड लावले आहे. श्रुतीने मराठीच नव्हे, तर तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटात काम करून, प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

श्रुती मराठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. इथे तिला १२ लाखाहून अधिक युजर्स फॉलो करतात. अभिनेत्री नेहमी तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट शेअर करत असते, ज्याला तिच्या चाहत्यांकडून खूप पसंती मिळते. यासोबतच ती तिचे वेगवेगळे फोटोशूट्स देखील चाहत्यांसोबत शेअर करते, जे इंटरनेटवर व्हायरल झालेले पाहायला मिळतात.

श्रुतीने पुन्हा तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये श्रुती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यात तिने हिरव्या साडीसह अतिशय मोजकेच दागिने घातले आहेत. हलका पण अप्रतिम असा मेकअप करून तिने साधी हेअरस्टाईल केलेली पाहायला मिळत आहे. श्रुतीचा या लूकवर चाहते अक्षरशः भाळले आहेत. त्यामुळेच कदाचित फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे.

हे ग्लॅमरस फोटो शेअर करत, श्रुतीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “खामोशी की तरह मै छुपालू सारी उलझने…शोर कभी मुश्किलों को आसान नहीं करता.” हे फोटो चाहत्यांमध्ये खूप पसंत केले जात आहेत. बघता बघताच फोटोंवर तब्बल ४६ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. सोबतच चाहते कमेंट करून त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत.

श्रुतीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर २००८ मध्ये तिने ‘सनई चौघडे’ या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. २००९ मध्ये श्रुतीने ‘इंदिरा विजहा’ या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात सुपरस्टार नासिरसुद्धा दिसला होता. विशेष म्हणजे, हा चित्रपट अक्षय कुमार, करीना कपूर आणि प्रियंका चोप्रा यांच्या ‘ऐतराज’ या बॉलिवूड चित्रपटाच्या कहाणीवर आधारित होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा