‘अग्गंबाई सासूबाई’ या मराठी मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. मालिकेच्या कथेला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली. त्याप्रमाणेच यातील कलाकारांना देखील बरीच लोकप्रियता मिळाली. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरीही यातील पात्रं प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. यातील बबड्याची व्यक्तीरेखा तर खूप गाजली. बबड्या अर्थातच अभिनेता आशुतोष पत्कीला अपार लोकप्रियता मिळाली. आता बबड्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या चर्चेचे कारण म्हणजे, त्याचा नवा लूक होय.
वास्तविक आशुतोष पत्कीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या या नव्या लूकचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याची आगळीवेगळी अशी हेअरस्टाईल पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत आशुतोष म्हणाला की, “जेव्हा तुम्ही स्वतः चे केस कापताना तुमचा प्रयत्न फसतो.”
या नव्या लूकमुळे आशुतोषचा हा फोटो त्याच्या चाहत्यांमध्ये वेगाने व्हायरल होत आहे. शिवाय चाहते यावर कमेंट्स करून त्याच्या नवीन लूकचे कौतुकही करत आहेत. कमेंट करत एका युजरने लिहिले, “भाई कडक दिसतोय.” दुसरा म्हणतोय, “भारी दिसतोय दादा लूक.” याशिवाय चाहते त्याला मिस करत असल्याचे या कमेंट्स मधून दिसत आहे.
आशुतोष पत्कीबद्दल बोलायचे झाले, तर तो ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. त्याने या अगोदर बऱ्याच मालिकेमध्ये काम केले आहे, मात्र त्याला खरी ओळख ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेने मिळवून दिली. आशुतोष ‘मधु इथे चंद्र तिथे’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘दुर्वा’ या मालिकेत दिसला आहे. तसेच ‘वन्स मोअर’ या चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…