Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘शालू’च्या डान्सने पुन्हा चोरली लाखो मने; बघता बघताच पडला लाईक अन् कमेंट्सचा पाऊस

राजेश्वरी खरात एक अशी अभिनेत्री आहे, जी तिच्या अभिनयापेक्षा जास्त तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ या चित्रपटाद्वारे शालू अर्थातच, राजेश्वरी खरातने आपली विशेष ओळख निर्माण केली. चित्रपटात शालू आणि जब्याची प्रेमकथा जब्बर गाजली. जब्या बऱ्याच काळापासून लाईमलाईटपासून दूर आहे. मात्र शालू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. तिची फॅन फॉलोविंग देखील तगडी आहे. म्हणूनच की काय, तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल होऊ लागतात. चाहत्यांकडून तिचे व्हिडिओ मोठ्या आवडीने पाहिले जातात. नुकताच तिने शेअर केलेला व्हिडिओ पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.

वास्तविक हा एक डान्स व्हिडिओ आहे, जो राजेश्वरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात ती ‘आँखो में बसे हो तुम’ या हिंदी गाण्यावर नाचताना दिसत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, शालूने भडक लाल रंगाचा मखमली गाऊन परिधान केला आहे. यातील तिचे मूव्ह्ज आणि चेहऱ्यावरील हावभाव सर्वकाही अतिशय परफेक्ट आहे. सोबतच व्हिडिओतील तिच्या अदांनी चाहत्यांच्या काळजाचे ठोके चुकवले असतील, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. (rajeshwari kharats dance video once again goes viral on instagram)

गेल्या काही दिवसांपासून राजेश्वरी सतत तिचे डान्स व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडूनही खूप पसंत केले जाते. नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओ देखील त्यांना चांगलाच भावला आहे. व्हिडिओ शेअर होता क्षणीच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली. काही वेळापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला १४ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केलं आहे. सोबतच नेटकरी कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-संजू बाबाची पत्नी वयाच्या ४२ व्या वर्षीही आहे एकदम फिट; वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ केला शेअर

-‘आई शानदार असते!’ मुलाला कुशीत घेऊन आईने एका हाताने घेतला भन्नाट कॅच; अनुष्का शर्माही झाली इम्प्रेस

-‘अभिनेत्याला जामीन अन् संताला जेल’, म्हणत पर्ल पुरीवर भडकले आसारामचे भक्त, सोशलवर मीडियाद्वारे राग व्यक्त

हे देखील वाचा