आपल्या जीवनातील वडिलांचे महत्व शब्दांत सांगणे खरंच कठीण आहे. वडील त्यांच्या मुलांसाठी जे काही करतात, त्याची परतफेड करणे जवळजवळ अशक्यच आहे. आपण छोटे मोठे औचित्य साधून वडिलांवरचे आपले प्रेम वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करत असतो. मात्र आज २० जून निमित्त सर्वांना वडिलांवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी खास संधी मिळाली.
सर्वत्र ‘पितृदिन’ मोठ्या प्रेमाने साजरा केला जात आहे. ‘पितृदिना’निमित्त मिळालेल्या संधीचा फायदा घेत सर्वचजण वडिलांवरील त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रेम व्यक्त करण्याचे प्रमाण जास्त आहे. सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या कलाकारांपर्यंत सर्वजण वडिलांचा फोटो शेअर करून, पितृदिनाच्या शुभेच्छा देत आहेत.
याच खास संधीचा पुरेपूर फायदा घेत मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवने त्याच्या वडिलांवरचे त्याचे प्रेम व्यक्त केले. त्याने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून वडिलांना पितृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थ स्वतः देखील दोन गोड मुलींचा वडील आहे. त्याने मुलींसोबतचा त्याचा फोटो शेअर करून, स्वतः ला देखील पितृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (sidhharth jadhav shared special post on special occassion of fathers day)
हा फोटो शेअर करत, सिद्धू कॅप्शनमध्ये म्हणतोय की, “बापमाणूस. तुम्हाला पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा आणि मला पण.” नेहमीप्रमाणे अभिनेत्याची खास पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते फोटोवर लाईक आणि कमेंट करून प्रतिक्रिया देत आहेत. विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ नाही. तर सिद्धार्थ वेळोवेळी वडिलांवरचे व मुलींवरचे त्याचे प्रेम व्यक्त करताना दिसतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सोशल मीडियावर व्हायरल झाला कार्तिक आर्यनचा नवा लूक; तर चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा
-‘अक्षय कुमारला मीच स्टार बनवले, नाहीतर तो…’ लाईव्ह सेशनमध्ये गायक अभिजित भट्टाचार्य यांचा मोठा दावा