टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १२’ ची स्पर्धक सृष्टी रोडे हिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. नुकतेच अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांना हैराण केले आहे. तिने हॉस्पिटलमधील तिचा एक व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. तिने तिच्या चाहत्यांना सांगितले की, तिने एक सर्जरी केली आहे. त्यामुळे ती आता हॉस्पिटलमध्ये आहे.
नुकतेच सृष्टीने तिच्या इंस्टा स्टोरीला हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, ती हॉस्पिटलमध्ये भरती झाली आहे आणि आता ती ठीक आहे. सृष्टीने सांगितले की, तिची सर्जरी होऊन आता ५ दिवस झाले आहेत. यासोबत तिने लिहिले की, “माझी सर्जरी होऊन आता ५ दिवस झाले आहे. मी अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे. पण मी आता ठीक होत आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद.” या व्हिडिओमध्ये तिने हॉस्पिटलमधील गाऊन घातलेला दिसत आहे. ती बेडवर झोपलेली आहे आणि मास्क देखील लावला आहे. या व्हिडिओमध्ये ती हसत देखील आहे.
सृष्टी ही कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस’ या शोनंतर खूप चर्चेत आली होती. हा शो संपल्यानंतर ती तिच्या अफेअरमुळे खूप चर्चेत आली होती. शोमध्ये रोहित सुचांती आणि तिची खूप चांगली मैत्री झाली होती. त्यावेळी अशा अफवा पसरत होत्या की, त्या दोघींच्या अफेअर आहे. पण त्यावेळी सृष्टी टीव्ही अभिनेता मनीष नागदेव सोबत रिलेशनमध्ये होती. (Bigg Boss fame actress srishty rode’s surgery give health update on social media)
या अफवांनंतर तिचा मित्र करणवीर वोहरा याने या गोष्टीचा खुलासा करत सांगितले होते की, रोहित आणि तिच्यामध्ये काहीच नाहीये. त्यांच्यात केवळ मैत्री आहे. त्यानंतर रोहित आणि सृष्टीच्या अफेअरबद्दल बातम्या येणे बंद झाले होते. ‘बिग बॉस’ शोमुळे सृष्टीची लोकप्रियता खूप वाढली आहे. तिचे सोशल मीडियावर देखील खूप फॅन फॉलोविंग आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंटरनेटवर धमाल करतेय ‘ही’ दयाबेन; व्हिडिओ पाहून चक्रावले सोशल मीडिया युजर्स
-ऐश्वर्याशी झालेल्या ब्रेकअपनंतर विवेकने एका मंत्र्याच्या मुलीसोबत थाटला संसार; आज जगतोय सुखी आयुष्य
-चिमुकल्या ‘आनंदी’ची निरागसता पाहून प्रेक्षकांचे हरपले भान; ‘बालिका वधू २’चा प्रोमो झाला रिलीझ