Thursday, April 24, 2025
Home अन्य एकच नंबर! पती प्रदीप खरेरासोबत थिरकताना दिसली मानसी नाईक; पाहायला मिळाली जोडप्याची रोमॅंटिक बॉंडिंग

एकच नंबर! पती प्रदीप खरेरासोबत थिरकताना दिसली मानसी नाईक; पाहायला मिळाली जोडप्याची रोमॅंटिक बॉंडिंग

मराठी सिनेसृष्टीत आपल्या नृत्यकेलेने प्रेक्षकांना वेड लावणारी मानसी नाईक तर आपणा सर्वांना ठाऊकच आहे. एकापेक्षा एक भन्नाट गाण्यांवर डान्स करून तिने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली आहे. आपल्या मनमोहक अदांनी रसिकांना घायाळ करणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. एकापेक्षा एक जबरदस्त फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, ती नेहमीच चर्चेचा विषय बनते.

आतापर्यंत व्हिडिओमध्ये मानसी एकटीच दिसायची. मात्र आता लेटेस्ट व्हिडिओमध्ये अभिनेत्रीसोबत तिचा पती प्रदीप खरेरा देखील दिसला आहे. होय, मानसीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ती पतीसोबत नाचताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, या व्हिडिओमध्ये हे जोडपे ‘आप के आ जाने से’ या गाण्यावर रोमँटिक स्टाईलमध्ये डान्स करत आहेत.

या दोघांचा हा रोमँटिक अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मुस्कुराना कोनसा मुश्कील काम है,बस तुम्हे सोचना ही तो पडता है.” व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत आणि लाईक्सचाही पाऊस पडत आहे. शिवाय कलाकारांनीही यावर कमेंट करून त्यांचे कौतुक केले आहे. (manasi naik dancing with husband pradeep kharera see video)

मानसी नाईकने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गीतांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू

‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर समुद्राच्या सानिध्यात घालवतेय तिचा वेळ; बीचवरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

तापसीवर कंगनाची आगपाखड! म्हणाली, ‘मी सोडलेल्या चित्रपटांसाठी निर्मात्यांकडे भीक मागायची, आज तिची लायकी…’

हे देखील वाचा