मनोरंजन क्षेत्रातील कलाकार नेहमीच असे काही करतात, ज्यामुळे ते चर्चेचा विषय ठरत असतात. नेहमीच कडेकोट सुरक्षेमध्ये राहणारे हेच कलाकार, जेव्हा सामान्य लोकांमध्ये असेच बाहेर पडतात, तेव्हा चाहतेही हैराण झाल्याशिवाय राहत नाहीत. नुकताच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक आलिशान कार रस्त्यावरून जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही कार दाक्षिणात्य सुपरस्टार थालापती विजयची असल्याचे म्हटले जात आहे. (South Superstar Thalapathy Vijay Drives His Luxurious Car In Chennai Video Goes To Viral)
सोशल मीडियावर एक २६ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये म्हटले जात आहे की, विजय वाइन रंगाच्या स्वँकी रोल्स रॉयस घेऊन रस्त्यावर निघाला आहे.
व्हिडिओ होतोय व्हायरल
मात्र, हे स्पष्ट झाले नाही की, गाडी विजयच चालवत होता. माध्यमातील वृत्तामध्ये म्हटले गेले आहे की, विजयच आपली गाडी घेऊन रस्त्यावर निघाला होता. एक अनोळखी व्यक्ती या गाडीमागे जात होती. त्यानेच हा व्हिडिओ बनवला. तरीही हे सांगणे कठीण आहे की, विजय गाडी घेऊन स्वत: रस्त्यावर निघाला होता.
Thalapathy Vijay Car has been spotted on chennai outside #Beast #Vijay @actorvijay @CMOTamilnadu @Nelsondilpkumar pic.twitter.com/fP9O7ysrUw
— bsafhi (@bsafhi3_) June 28, 2021
यापूर्वीही तमिळनाडू विधानसभा निवडणुकीदरम्यान विजय मतदान केंद्रावर चक्क सायकल घेऊन पोहोचला होता. याची जोरदार चर्चा झाली होती.
https://www.instagram.com/p/CQnHvjUBKMI/?utm_source=ig_web_copy_link
विजयच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चित्रपट निर्मात्यांनी त्याच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करत चाहत्यांना सरप्राईझ दिले होते. विजयच्या या चित्रपटात पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
विजयच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने बाल कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. मुख्य अभिनेता म्हणून त्याने ‘नालया थीरपू’ या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट सन १९९२ मध्ये आला होता. त्याने जेव्हा या चित्रपटात काम केले होते, तेव्हा तो केवळ १८ वर्षांचा होता. यानंतर त्याने दाक्षिणात्य सिनेमात एकापेक्षा एक चित्रपट दिले.
विजयच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो लवकरच रश्मिका मंदानासोबत ‘थालापती ६५’ या चित्रपटात एकत्र दिसणार होता. मात्र, काही कारणास्तव हे शक्य झाले नाही. अशातच आता वृत्त आहे की, लवकरच एका प्रोजेक्टमध्ये रश्मिका आणि विजय एकत्र काम करताना दिसणार आहे. चाहतेही या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बापरे बाप! ‘द कपिल शर्मा शो’साठी कपिलने केली मानधनात वाढ? एका आठवड्यासाठी घेणार ‘इतके’ कोटी










