Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

सुयश टिळकने केला साखरपुडा; लवकरच ‘हिच्यासोबत’ अडकणार लग्नबंधनात

झी मराठीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे सुयश टिळक होय. या मालिकेनंतर सुयशच्या फॅन फॉलोविंगमध्ये कमालीची भर पडली आहे. अशातच त्याच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मंगळवारी (६ जुलै) सुयशचा साखरपुडा झाला आहे. (Marathi actor suyash Tilak got engaged, photo get viral)

सुयशने महाराष्ट्राची श्रावण क्वीन ठरलेल्या आयुशी भावेसोबत साखरपुडा केला आहे. त्यांनी साऊथ इंडियन पद्धतीने साखरपुडा केला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, या खास दिवशी आयुशीचा वाढदिवस होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्या दोघांनी साऊथ इंडियन पोशाख परिधान केला होता.

सुयशने हे फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्याने फोटो शेअर करून लिहिले आहे की, “माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री, तुझ्यासारखी जोडीदार भेटल्यामुळे मी खूप भाग्यवान आहे. आम्ही आमच्या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत.”

सुयश आणि आयुशीने त्यांच्या नात्याबाबत खूप गुप्तता पाळली होती. त्यांनी साखरपुडा करून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. याआधी सुयश ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधरसोबत रिलेशनमध्ये होता. त्यांचे एकत्र फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण काही दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली होती.

सुयश सध्या कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत त्याच्यासोबत सायली संजीव ही मुख्य भूमिकेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा