बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या भूमिका निभावून प्रेक्षकांच्या मनात त्यांची जागा निर्माण केली आहे. बॉलिवूड अभिनेता आलोक नाथ यांची ओळख नेहमीच एक संस्कारी वडील म्हणून राहिली आहे. अनेकवेळा त्यांना हीरो किंवा हेरोईनच्या वडिलांचे पात्र दिले जाते. त्यांच्या या पात्राला खूप पसंती देखील मिळत असते. एवढंच नाही तर त्यांचे हे पात्र पाहून इंडस्ट्रीमध्ये त्यांचे नाव ‘संस्कारी बाबूजी’ हे पडले आहे. आज साेमवारी (10 जुलै)ला आलोक नाथ यांचा वाढदिवस आहे. चला, तर जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील या खास गोष्टी.
आलोक नाथ यांचा जन्म 10 जुलै 1956 रोजी झाला होता. त्यांचे वडील एक डॉक्टर होते तर आई गृहिणी होती. त्यांच्या वडिलांची देखील इच्छा होती की, आलोकनाथ यांनी देखील त्यांच्याप्रमाणे डॉक्टर बनावे. आलोक नाथ यांनी त्यांचे शिक्षण दिल्ली येथे पूर्ण केले. कॉलेजनंतर त्यांचे मन अभिनयाकडे झुकले गेले. कॉलेजमध्ये असताना ते रुचिरा थिएटरमध्ये काम करत होते. त्यानंतर त्यांनी तीन वर्ष ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ मध्ये शिक्षण घेतले आणि तिथे जबरदस्त अभिनयाचे धडे घेतले. इथे मिळालेल्या शिक्षणामुळेच ते आज कोणतेही पात्र हुबेहूब निभावतात.
आलोक नाथ यांनी मोठ्या पडद्यासोबतच लहान पडद्यावर देखील वडिलांची भूमिका निभावली आहे. त्यांना तिथे देखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आलोक नाथ यांनी त्यांच्या करिअरमध्ये 140 चित्रपट आणि जवळपास 15 मालिकांमध्ये काम केले आहे. यामध्ये जास्त पात्र त्यांनी ‘बाबूजी’ या नावाने निभावली आहेत. 1980 मध्ये ‘गांधी’ या चित्रपटातून त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात त्यांचा अगदी छोटा रोल होता.
यानंतर ते मुंबईला आले. पण दुसरा चित्रपट मिळवण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली होती. ‘गांधी’ चित्रपटानंतर पाच वर्ष त्यांना चित्रपट मिळाला नव्हता. मधले दोन वर्ष त्यांनी पृथ्वी थिएटरमध्ये नादिरा बब्बरसोबत काम केले होते. त्याच वेळी त्यांना ‘मशाल’ चित्रपटात एक छोटासा रोल मिळाला.
खरंतर आलोक नाथ यांना ‘संस्कारी बाबूजी’ हा टॅग नंतर मिळाला, पण सुरुवातीला त्यांनी रोमँटिक हीरोचे पात्र देखील निभावले आहे. 1987 मध्ये आलेला ‘कामाग्नी’ या चित्रपटात त्यांनी अत्यंत रोमँटिक आणि हॉट सीन दिले होते. यासोबतच ‘विनाशक’, ‘षड्यंत्र’ आणि ‘बोल राधा बोल’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका पार पाडली होती. त्यांना या पात्रात देखील प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. यानंतर एकदा आलोकनाथ यांना जितेंद्र यांच्या वडिलांचे पात्र निभावण्याची ऑफर आली होती. परंतु त्यावेळी त्यांनी हे पात्र निभावण्यास नकार दिला होता.
आलोक नाथ यांनी ‘मैने प्यार किया’, ‘हम आप के है कौन’, ‘विवाह’, ‘एक विवाह ऐसा भी’ यांसारख्या चित्रपटात एका अशा वडिलांचे पात्र निभावले आहे, त्यांना पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येईल. त्यांनी ‘बुनियाद’, ‘हम लोग’, ‘बिदाई’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
त्यांनी अलीकडील काळात त्यांच्यावर असलेला हा संस्कारी बाबूजीचा टॅग मोडण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्यांनी ‘सोनू के टिटू की स्विटू’ आणि ‘दे दे प्यार दे’ यांसारख्या चित्रपटात एकदम कूल आजोबा आणि वडिलांचे पात्र निभावले आहे. (Birthday special : journey of Actor aloknath from romantic hero to sanskarI babu ji)
अधिक वाचा-
Birth Anniversary: ‘रामायण’ मधील रामाशी हाेताे तबस्सुम यांचे खास नाते, जाणून घ्या अभिनेत्रीशी संबंधित न ऐकलेले किस्से
अश्विनी महांगडेच्या ‘या’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्री म्हणाली, “शेवटचा भाग…”