सिनेसृष्टीत ‘सिद्धू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ जाधवला कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याची एक वेगळीच स्टाईल आणि अंदाज आहे, ज्यामुळे आज त्याचे लाखो चाहते आहेत. एक नम्र पार्श्वभूमी आणि सावळे पण भोळे रूप घेऊन, सिद्धार्थने चित्रपटसृष्टीत अथक परिश्रम, उत्कटतेने त्याचा मार्ग स्वतः कोरला. अभिनयाप्रमाणेच तो सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतो. तसेच सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी संवाद साधत असतो.
नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे सिद्धार्थ खूप चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सिद्धार्थचा निराळाच स्वॅग पाहायला मिळाला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अगोदर तो काळ्या रंगाच्या गाडीतून स्टाईलमध्ये उतरतो. यात त्याने पोपटी रंगचा शर्ट आणि टोपी, सोबतच जीन्स परिधान केली आहे. गाडीतून उतरल्यानंतर तो मीडियाला फोटोसाठी पोझही देताना दिसला.
एकंदरीत या व्हिडिओमध्ये चाहत्यांना सिद्धूचा स्वॅग पाहायला मिळाला आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये ‘स्टाईल में रेहनेका’ असं लिहिलं आहे. सोबतच त्याने आपला ‘आपला सिद्धू’ असे कॅप्शनही या व्हिडिओला दिले आहे.
आपणा सर्वांना माहित आहे की, सिद्धार्थ एका गरीब कुटुंबातून सुपरस्टारच्या पदापर्यंत पोहचला आहे. सर्व सामान्य कुटुंबातील मुलांसाठी तो एक आदर्श आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सिध्दार्थने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात टीव्ही मालिकांमधून केली. नंतर त्याने ‘अगं बाई अरेच्चा’द्वारे मराठी चित्रपटात पदार्पण केले होते. पुढे, ‘जत्रा’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘दे धक्का’, ‘हुप्पा हुइया’, ‘टाइम प्लीज’, ‘धुरळा’ इत्यादी चित्रपटातील त्याच्या अभिनयाने त्याला प्रत्येक मराठी घरात पोहचवले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-