मागील १३ वर्षांपासून प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा कार्यक्रम कोणता? असं विचारलं, तर सर्वप्रथम सर्वांच्या तोंडात नाव येतं, ते म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमाचं. या मालिकेमधील प्रत्येक पात्र देशातील घराघरात पोहोचला आहे. या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आतापर्यंत आपण जेठालाल, बबिताजी, दयाबेनसह इतर अन्य कलाकारांचे मजेशीर व्हिडिओ पाहिले आहेत. नुकतेच मालिकेमध्ये जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारणारे चंपकलाल म्हणजेच अमित भट्ट यांचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते पुरते लोटपोट झाले आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये बापूजींनी आपला मुलगा जेठालालला कोणतेही काम सांगितले आणि ते पूर्ण न केले, तर त्याला चांगलेच ओरडायचे. मात्र, खऱ्या आयुष्यात बापूजीच्या यापेक्षा उलट आहेत. जर अमित भट्ट यांची पत्नी कृती त्यांना कोणतेही काम सांगते, तेव्हा ते काम त्यांना पूर्ण करावेच लागते. याचा प्रत्यय या व्हिडिओतून येत आहे. अमित भट्ट यांचा एक व्हिडिओ भन्नाट व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते फरशी पुसताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Jethalal Father Champaklal Aka Amit Bhatt Learn How To Clean His House)
पत्नी कृतीने शिकवले फरशी पुसणे
या व्हायरल व्हिडिओत अमित यांची पत्नी कृती सोफ्यावर बसली आहे आणि ती पती अमित भट्ट यांना शिकवत आहे की, फरशी कशाप्रकारे पुसली जाते. ती सोफ्यावर बसून अमित यांना कपडा पिळण्यास आणि त्यानंतर फरशी पुसण्याच्या सूचना देत आहे. व्हिडिओत अमित खूपच रागाने आपल्या पत्नीकडे पाहत आहेत. मात्र, शेवटी ते फरशी पुसत पुसत जमिनीवर झोपतात. त्यांच्या या व्हिडिओला भरपूर पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला आहे.
नेटकरी म्हणाले, जेठालालला बोलवायचं
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते कमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एका युजरने लिहिले की, “चंपक चाचा तुमची पाठ गेली.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “जेठालालला बोलवायचं.”
चाहते हा व्हिडिओ पाहून स्वत: चे हसू रोखू शकत नाहीत. अमित यांना हा व्हिडिओ इंस्टाग्राम रीलवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अमित आणि त्यांची पत्नी कृती नेहमीच आपल्या मजेशीर व्हिडिओतून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतात.
जेठालालपेक्षा लहान आहेत बापूजी
ऑनस्क्रीन जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारणारे बापूजी म्हणजे अमित भट्ट हे खऱ्या आयुष्यात मात्र दिलीप जोशी यांच्याशी लहान आहेत. त्यांच्या वयात ५ वर्षांचे अंतर आहे. विशेष म्हणजे, दिलीप जोशी आणि अमित भट्ट हे ‘एफआयआर’ या मालिकेतही एकत्र झळकले आहेत.
माध्यमांतील वृत्तानुसार, अमित भट्ट हे एका एपिसोडसाठी तब्बल ८० हजार रुपये मानधन घेतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खेसारी लाल यादवच्या ‘या’ गाण्यावर अभिनेत्री राणीने लावले जोरदार ठुमके; दिलखेचक अदांना चाहत्यांची पसंती
-पती राज कौशल यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच घराबाहेर दिसली मंदिरा बेदी, आईसोबतचा व्हिडिओ तुफान व्हायरल
-‘…ती सई चोर आहे’, म्हणत मोठ्या बहिणीच्या व्यथा मांडताना दिसली मृण्मयी; सोबतच गौतमीवर लावले तिने गंभीर आरोप