Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

दु:खद! संगीतकार एआर रेहमान यांना मातृशोक; आई करीमा बेगम यांचे निधन

सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांची आई करीमा बेगम यांचे सोमवारी चेन्नई येथे निधन झालं. रहमान यांनी ट्विटरवर आपल्या आईचा फोटो शेअर करुन या वृत्ताला दुजोरा दिला. मागील काही काळापासून त्या अस्वस्थ होत्या. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. परंतु चेन्नईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वडील आणि संगीतकार आर.ओ.शेखर यांचं निधन झालं तेव्हा ए.आर. रहमान हे केवळ नऊ वर्षांचे होते. तेव्हा ए.आर. रहमान यांचे त्यांच्या आईनेच संगोपन केले. बर्‍याच मुलाखतींमध्ये ए.आर. रहमान यांनी सांगितलं होतं की त्यांच्यातील संगीत प्रेमाला सर्वात आधी ओळखणारी आणि ते त्यांच्यात जपणारी ही त्यांची आईच होती.

एकदा तर माँ तुझे सलाम हे गाणं लिहिताना रहमान यांना गाण्याच्या ओळीच सुचत नव्हत्या. कारण ते देशप्रेम आणि त्या दृष्टिकोनातून गाणं लिहत होते. परंतु त्यांनी हा विचार सोडला आणि बऱ्याच दिवसांपासून स्वतःच्या आईवर काही तरी लिहिण्याची इच्छा पूर्ण केली आणि मग माँ तुझे सलाम हे गाणं उदयास आलं. हा किस्सा त्यांनी माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला होता.

ए.आर. रहमान हे त्यांच्या आईच्या अगदी जवळ होते. त्यांच्या आईची ओढ ही कायम संगीताकडे राहिलेली आहे. उलट त्या रेहमान यांच्याहूनही जास्त आध्यात्मिकरित्या संगीताशी जोडल्या गेल्या होत्या. अर्थात ए.आर. रहमान यांना संगीत क्षेत्राकडे वळण्यासाठी त्यांच्या आईनेच लहानपणापासून प्रोत्साहित केलं होतं. अशा प्रकारचा मानसिक आधार फार कमी मुलांना त्यांच्या पालकांकडून मिळतो आणि ए.आर. रहमान हे त्याच नशीबवान मुलांपैकी एक होते. म्हणूनच की काय हेच ए.आर. रहमान भारतासाठी ऑस्करसारखा पुरस्कार जिंकून आले.

हे देखील वाचा