Wednesday, July 16, 2025
Home बॉलीवूड काम मिळवण्यासाठी ७१ वर्षीय शरत सक्सेना रंगवतात मिश्या; म्हणाले, ‘चांगल्या भूमिका फक्त अमिताभ बच्चनसाठी’

काम मिळवण्यासाठी ७१ वर्षीय शरत सक्सेना रंगवतात मिश्या; म्हणाले, ‘चांगल्या भूमिका फक्त अमिताभ बच्चनसाठी’

हिंदी चित्रपटसृष्टीत तब्बल ४ दशकांपासून काम करत असलेले ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना आपल्या निगेटिव्ह रोलसाठी ओळखले जातात. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. मात्र, आजही बॉलिवूडमध्ये त्यांची खास ओळख बनू शकलेली नाही. दुसरीकडे शरत यांचे समकालीन अभिनेते अमिताभ बच्चन आज बॉलिवूडचे महानायक आहेत. आपली ओळख आणि काम न मिळण्याच्या समस्येवर शरत यांनी एका मुलाखतीत मोकळेपणाने चर्चा केली आहे.

रेडिफसोबत बोलताना शरत सक्सेना यांनी आपले दु:ख व्यक्त करत म्हटले की, सीनियर अभिनेत्यांसाठी जितक्या चांगल्या भूमिका लिहिल्या जातात, त्या सर्व भूमिका अमिताभ यांना ऑफर केल्या जातात. त्यांनी अमिताभ यांना एकप्रकारे दोष दिला आहे. ते म्हणतात, “चित्रपटसृष्टीत तरुण लोक आहेत. वयस्कर व्यक्तींची इथे गरज नाही. दुर्दैवाने म्हणा, आम्ही मरतही नाही. आम्ही आता जिवंत आहोत आणि काम शोधत आहोत. इंडस्ट्रीमध्ये सीनियर्ससाठी किती भूमिका लिहिल्या जातात? जितक्या चांगल्या भूमिका लिहिल्या जातात, त्या सर्व अमिताभ बच्चनकडे जातात.”

“जितक्या वाईट गोष्टी असतात, त्या आमच्यामध्ये वाटल्या जातात. अधिकतर वेळ आम्ही त्यांना नकार देतो. त्यावेळी माझ्यासारख्या लोकांचे काम जवळपास शून्य होते,” असेही ते म्हणाले. (Actor Sharat Saxena Says Good Roles For Older People Goes To Amitabh Bachchan)

‘मिश्या आणि केस रंगवतो’
शरत यांनी आपली समस्या सांगताना हेही सांगितले की, तरुण दिसण्यासाठी त्यांनी खूप मेहनत करावी लागते. ते म्हणतात, “७१ वर्षांच्या वयात मी दोन तास वर्कआऊट करतो. जेणेकरून मी २५ वर्षांच्या मुलांनाही मात देऊ शकेल आणि एका दणकट व्यक्तीप्रमाणे दिसेल. मी आपले केस आणि मिश्या रंगवतो. आपण मला शेरनी चित्रपटात पाहिले असेल. मी स्वत:ला ५०-५५ वयाचा दाखवण्यासाठी प्रयत्न केला आहे. नाहीतर मला काम मिळणार नाही.”

शेरनीमध्ये दिसले होते शरत सक्सेना
शरत सक्सेना नुकतेच प्रदर्शित झालेल्या शेरनीमध्ये झळकले होते. या चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत होत्या. शरत यांनी पोचरची भूमिका साकारली होती. चित्रपटाला क्रिटिक्सकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा