टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही आज घराघरात पोहचली आहे. त्यांच्या निखळ मनोरंजनामुळे आज प्रेक्षकांच्या जीवनातील काही काळ आनंदमय जात आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राचे एक वेगळेच कौशल्य पाहण्यास मिळते. परंतु या मालिकेतील जेठालाल या पात्राची गोष्टच काही वेगळी आहे. परफेक्ट टायमिंग, विनोदी स्वभाव या सगळ्या गोष्टींमुळे तो प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हे पात्र सध्या अभिनेते दिलीप जोशी निभावत आहेत.
अनेकांना ही गोष्ट माहीत देखील नसेल की, सुरुवातीला मालिकेच्या निर्मात्यांना दिलीप कुमार हे या पात्रासाठी आवडत नव्हते. निर्मात्यांनी अनेक कलाकारांना अप्रोच केले होते, पण त्यांनी नकार दर्शवला होता. दिलीप कुमार यांनी या पात्रासाठी होकार दर्शवला आणि या पात्राला सर्वत्र प्रसिद्ध केले. चला तर जाणून घेऊया त्या कलाकरांबद्दल ज्यांनी जेठालाल हे पात्र निभवाण्यास नकार दिला होता. (Taarak Mehta ka ooltah chashma actor Dilip Joshi story of jethalal role)
अली असगर
अभिनेता अली असगर याने टेलिव्हिजनवरील अनेक कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याला जेठालाल या पात्राची ऑफर आली होती, परंतु त्याच्या कामामुळे त्याने हे पात्र करण्यास नकार दिला होता.
राजपाल यादव
बॉलिवूडमधील लोकप्रिय कॉमेडियन राजपाल यादव याला देखील जेठालाल हा रोल ऑफर केला होता. त्याला टीव्ही शोमध्ये काम करायचे नव्हते, त्यामुळे त्याने नकार दिला होता.
योगेश त्रिपाठी
हप्पू दारोगा या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेला अभिनेता योगेश त्रिपाठी, याला देखील जेठालालच्या रोलसाठी ऑफर आली होती. परंतु तो ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता त्यामुळे त्याने नकार दर्शवला होता.
किकू शारदा
‘द कपिल शर्मा शो’ मधील किकू शारदाने देखील जेठालालचे पात्र नाकारले होते. त्यावेळी त्याला स्टँडअप कॉमेडी जास्त आवडत होती.
अहसान कुरेशी
एका वेगळ्याच अंदाजात आपले डायलॉग म्हणणारा अभिनेता अहसान कुरेशी हा देखील एक स्टँडअप कॉमेडियन होता. त्याला देखील जेठालाल या पात्राची ऑफर आली होती पण त्याने त्यावेळी नाकारली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लग्नापूर्वी दिशाच्या रूमबाहेर ‘मेरी दुल्हन कहा है’, म्हणत ओरडताना दिसला राहुल; नववधू बाहेर येताच…
-महाकठीण! ‘या’ फोटोतील कपिल शर्माला ओळखलं का? कॉमेडियनने दिलं मजेशीर चॅलेंज