Thursday, April 24, 2025
Home अन्य तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये जुन्या ‘अंजली भाभी’ ला यायचंय परत , पण निर्मात्यांच्या मनात काहीतरी वेगळंच शिजतंय

तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये जुन्या ‘अंजली भाभी’ ला यायचंय परत , पण निर्मात्यांच्या मनात काहीतरी वेगळंच शिजतंय

‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेतील अंजली भाभीची भूमिका साकारणारी नेहा मेहता मालिकेत परत येऊ इच्छिते, पण आता मालिकेच्या निर्मात्यांनी तिच्या परत येण्याच्या शक्यतेवर पूर्णविराम लावला आहे.

निर्माते असित कुमार मोदींनी हे स्पष्ट केले की, नेहाला शोमध्ये परत यायचे होते पण त्यावेळी खूप उशीर झाला होता. आम्ही कार्यक्रमामध्ये घेतलेल्या नवीन कलाकारांचे काम चांगले आहे. शिवाय एकदा नवीन कलाकाराला घेतल्यावर त्यांना कार्यक्रमातून काढून टाकणे अजिबात योग्य नाही. नेहा मेहता सुरुवातीपासूनच तारक मेहता सीरियलशी संबंधित होती, १२ वर्षांचा हा प्रवास वादाने संपला. जेव्हा तिने हा कार्यक्रम सोडला तेव्हा तिने त्यामागील कारण असे सांगितले की तिला सिरियल संबंधी काही अडचणी होत्या ज्याचे निराकरण केले गेले नाही.

मात्र, नंतर नेहा मेहतानेही शोमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ती म्हणाली होती, “हो, मी परत येण्याचा विचार केला. पण त्याआधी मला सेटवरील काही नियम बदलण्याची इच्छा होती.”

नेहा म्हणाली की वडिलांच्या सांगण्यावरून तिने असित मोदी यांच्याकडे परत येण्यासाठी विचारणा केली. ती म्हणाली, “मी असित मोदींचा खूप आदर करते. मी त्यांना सांगितले की या काही गोष्टी आहेत, आपण त्यांचा विचार केला पाहिजे आणि हे योग्य देखील आहे. परंतु जर तुम्हाला असे सांगितले गेले की आपल्या अहंकारासंबंधीच्या समस्या सोडवा आणि मग आमच्या सोबत काम करा तर काय? या उपर जर तुम्हाला  ईच्छा असेल तर तुम्ही गेलात तरी चालेल, तुमच्या ऐवजी कोणीतरी पैशात काम करायला तयार होईल. हे असे कोणासोबतही होऊ शकते, म्हणून आता मी माझ्या आयुष्यात पुढे जात आहे.”

तीने शो सोडण्याबद्दल संपूर्ण गोष्ट सांगितली नाही परंतु ती असं म्हणाली की बर्‍याच प्रकरणांमध्ये मौन बाळगणं हे उत्तम उत्तर आहे. ती म्हणाली, ‘कधीकधी सर्वोत्कृष्ट उत्तर म्हणजे एखाद्या विषयावर मौन बाळगणे असते. ”नेहा पुढे म्हणाली की ती लोकं चूकिची आहेत हे कोणालाही मान्य होणार नाही.

तारक मेहता मध्ये आता अंजली भाभीची भूमिका सुनिना फौजदारची साकारत आहे.

हे देखील वाचा