बिग बॉसचं घर आणि तिथे काही घडलं नाही असं कधीच होणार नाही. म्हणजे याच घरात प्रत्येक स्पर्धक हा एकमेकांची उणीधुणी काढत असतो. आपण स्वतः किती चांगले आहोत हे दाखवण्यासाठी इतरांबद्दल गैरसमज पसरवणे हा या घरात राहण्याऱ्या स्पर्धकांसाठी जणू खेळाचा भागच झाला आहे. अशात बिग बॉस १४ या पर्वात आता पर्यंत कोण कोण घराबाहेर आलं, कोण कोण पुन्हा नव्याने घरात आलं या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाऊक आहेतच. राखी सावंत, राहुल महाजन यांच्यासारखे जुने स्पर्धक पुन्हा एकदा आपल्याला या घरात पाहायला मिळत आहेत. राहुल महाजनने नुकतंच घरामध्ये राखी सावंतबद्दल एक खुलासा केला आहे. नेमकं तो काय म्हणाला आहे राखी बद्दल हे आज आपण जाणून घेणार आहोत.
राखी सावंत जिथून बिग बॉस 14 मध्ये आली आहे तेव्हापासून ती प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करतेय. राखी जे काही करते, ते सर्व चर्चेत येतं. मंगळवारी प्रसारित झालेल्या भागात राखी आणि जास्मिन भसीन एकमेकींना भिडल्या. जास्मिनने राखीच्या डोक्यावर पेंग्विन मास्क परिधान केला. राखी यावर म्हणाली की यामुळे तिच्या नावाची खराबी झालीये आणि ती मोठ्याने ओरडू लागली.
राखी आणि राहुल महाजन बर्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखत आहेत. राखी आतापर्यंत राहुलला तीचा १२ वर्षे जुना मित्र मानत आहे, तर राहुल म्हणतो की ‘राखी का स्वयंवर’ शो नंतर तो तिला कधीच भेटला नव्हता. राहुल महाजन अर्शीला सांगतो की प्रत्यक्षात राखी मानसिकरित्या खूपच एकटी आहे म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तिचे हे सगळे प्रयत्न सुरू असतात. तिने एकदा सांगितलं होतं की तिला रितेश नावाचा नवरा आहे. परंतु दोघे कधीही एकत्र राहत नाहीत. दोन वर्ष झाली ते एकमेकांना भेटले देखील नाहीत. इतकंच काय ‘राखी सावंतने लग्न झाल्यापासून अजूनही हनीमून साजरा केला नाहीये.
राहुल पुढे म्हणतो की ‘ती मानसिकदृष्ट्या एकटी आहे. तिची इच्छा आहे की तिच्या भोवताली लोक असावेत. असुरक्षिततेच्या भावनेमुळे ती हे सर्व करते. ती स्वत:ला जगात एकटी समजते. तीची आई आजारी आहे. वडील हयात नाहीत. भावंडांसोबत काहीना काही वाद सुरू आहेत, अगदी नवऱ्याला सुद्धा भेटता येत नाही त्यामुळे ती सध्या खूप एकटी आहे.’
राहुल महाजन आणि अर्शी खान यांच्या संभाषणात राहुल वैद्य सहभागी होतो. राहुल महाजन सांगतो की ‘तीला वडील नाहीत. बालपणी डांस केल्यामुळे तिचे वडील तिला खूप मारहाण करायचे. तीच्याकडे प्रसिद्धी आहे, संपत्ती आहे पण सोबत लोकं नाहीत. तीच असं मत आहे की तिने जी एक वेगळीच राखी जगासमोर उभी केली आहे ती टिकायलाच हवी. हे द्वंद्व तिची वास्तविकता आणि जगाला माहित असलेल्या राखी सावंत यांच्यातच सुरू आहे.’
राहुल महाजनने हा गौप्यस्फोट केला आहे खरा पण जेव्हा ही गोष्ट राखीला कळेल तेव्हा घरात काय माहौल असेल याचा आपण अंदाजच बांधू शकता. कारण हे बिग बॉस आहे इथे काहीही घडू शकतं. त्यामुळे आता घरात पुढे आणखी काय राडे होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.