Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड ‘ती माझा जीव घेईल…’, जेव्हा करीना कपूरबाबत बोलताना सैफ अली खानने केला होता त्या गोष्टीचा खुलासा

‘ती माझा जीव घेईल…’, जेव्हा करीना कपूरबाबत बोलताना सैफ अली खानने केला होता त्या गोष्टीचा खुलासा

या वर्षी लॉकडाऊन दरम्यान देशातील अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सगळ्या गोष्टी बंद होत्या. महत्वाचं म्हणजे सगळे ब्युटी पार्लर आणि कटिंग सलून बंद होते. या गोष्टीचा परिणाम सामान्य नागरिकांपासून ते कलाकारांवर देखील झाला होता. सलून बंद असल्याने अनेकजण घरीच केस कापत होते. कलाकार त्यांच्या हातानेच घरी केस कापत होते. त्यामुळे लॉकडाऊन दरम्यान अनेक वेगवेगळ्या हेअरस्टाईलचा शोध लागला होता. याबाबत अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. पण करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा याबाबत कोणताच व्हिडिओ समोर आला नव्हता. याबाबत आता सैफ अली खानने त्याचे म्हणणे मांडले आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, सैफ अली खान जेव्हा ‘फिट अप विद द स्टार्स’ मध्ये गेला होता. तेव्हा‌ तो हेअर स्टाईलच्या मुद्यावरून करीना कपूर आणि त्याच्याबाबत बोलला आहे. जेव्हा होस्टने करीना कपूरचे केस कापण्याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा सैफने मजेशीर अंदाजात सांगितले की, “जर मी असे काही केले, तर ती मला मारून टाकेल. तिचे केस कापण्याचा प्रयत्न करणे हे खूप अनप्रोफेशनल आहे. शेवटी ती राष्ट्रीय संपत्ती आहे. आम्ही एकमेकांच्या केसांचे नुकसान करू शकत नाही. ती असं काही करू शकते पण आजपर्यंत तिने असं कधीच केले नाही.” (Saif Ali Khan said about kareena Kapoor, she will kill me if I do this)

या शो दरम्यान जेव्हा सैफने मागील काही पात्र निभावले होते ते दाखवले गेले. तेव्हा तो म्हणाला की, “आधी माझी हेअर स्टाइल खूप खराब होती.” तो ‘दिल्लगी’ या चित्रपटातील लांब केसांवर बोलत असतो. तो म्हणतो की, “मी यामध्ये अमर चित्र कथेतील हीरो वाटत होतो. ते खऱ्या केसांपेक्षा खूप चांगले होते.”

करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपे आहे. सैफ अली खानचे हे दुसरे लग्न आहे. त्या दोघांच्या वयामध्ये खूप अंतर आहे. पण या गोष्टीचा परिणाम त्यांच्या नात्यावर अजिबात होत नाही. सैफ आणि करीनाला जेह आणी तैमूर ही दोन मुलं आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूड निर्माता सत्येंद्र त्यागीवर एका महिलेने केले गंभीर आरोप; नंदग्राममध्ये दाखल करण्यात आला गुन्हा

-आदित्य नारायणही घेणार ‘बिग बॉस १५’मध्ये सहभाग? सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला खुलासा

-सई ताम्हणकरचा स्टायलिश अंदाज अन् हॉट लूक करतोय चाहत्यांना वेडा; कलाकारांच्याही उमटतायेत प्रतिक्रिया

हे देखील वाचा