Wednesday, June 25, 2025
Home अन्य ‘ऑंखो मैं तेरी…!’ भारती सिंग बनली ‘ओम’ची ‘शांतीप्रिया’; गजब लूकमधला व्हिडिओ आला समोर

‘ऑंखो मैं तेरी…!’ भारती सिंग बनली ‘ओम’ची ‘शांतीप्रिया’; गजब लूकमधला व्हिडिओ आला समोर

जेव्हापासून चित्रपटसृष्टीला सुरुवात झाली, तेव्हापासूनच कॉमेडी हा चित्रपटातील एक अविभाज्य भाग आहे. कॉमेडीशिवाय चित्रपटाला रंगत येत नाही. परंतु सुरुवातीच्या काळात केवळ पुरुष मंडळी कॉमेडी सीन करायचे. कारण महिलांना केवळ इमोशनल सीन, रडाराडी हे असले सीन खूप चांगले देता येतात, असा एक समज झाला होता. परंतु येणाऱ्या काळात महिलांनी देखील कॉमेडी क्षेत्रात काम करून लोकांचा हा समज चुकीचा ठरवला आहे. या सगळ्यांवर मात करून आज कॉमेडी क्वीन अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे भारती सिंग होय. भारती सिंगने खूप मेहनत करून तिचे नाव कमावले आहे. ती आज प्रेक्षकांना हसावण्यात काहीही कमतरता ठेवत नाही. अशातच भारतीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला नक्कीच दीपिका पदुकोणची आठवण येईल.

व्हायरल भयानीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भारती सिंग तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधून खाली उतरते. तिने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील दीपिका पदुकोणसारखा गेटअप केला आहे. तिने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिचा पती हर्ष लिंबाचीया याने देखील शाहरुख खान प्रमाणे गेटअप केला आहे. ते दोघे पॅपराजींना पोझ देताना दिसले आहे. तसेच तेथून जाताना ती ‘आंखो मैं तेरी अजब सी’ हे गाणे म्हणते. (Bharti singh’s video viral on social media in shanti priya gate up)

तिच्या चाहत्यांना नेहमीप्रमाणे तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. सगळेजण कमेंट करून तिच्या या व्हिडिओचे कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानचा ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटातील तिचा लूक प्रेक्षकांना खास पसंत पडला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यूट्यूबवर ‘जालिमा कोका कोला’ गाण्याने केला राडा! नोरा फतेहीच्या डान्सने पुन्हा एकदा जिंकली प्रेक्षकांची मनं

-दीपिकाने अंगावर काटा आणणारा, भयावह व्हिडिओ केला शेअर; नेटकऱ्यांकडून आगामी चित्रपटाबद्दल लावला जातोय अंदाज

-व्हायरल व्हिडिओला प्रतिक्रिया देत, धर्मेंद्र यांनी नातू करण देओलचे केले कौतुक; म्हणाले, ‘तू तुझ्या पंजीसारखा…’

हे देखील वाचा