‘बिग बॉस १४’ ची विजेती आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुबीना दिलैक. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर रुबीना खूपच चर्चेत आली होती. सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंचा तडका ती नेहमीच सोशल मीडियावर लावत असते. तिच्याबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. सोशल मीडियावरील तिच्या कोणत्याही फोटोवर नजर टाकल्यास आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते, ती म्हणजे तिच्या प्रत्येक फोटोवर प्रेक्षकांच्या प्रेमाचा वर्षाव होत असतो. अशातच तिचा आणखी एक फोटो प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
रुबीनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रुबीना अत्यंत बोल्ड आणि हॉट दिसत आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. तसेच गळ्यात मोत्यांची ज्वेलरी घातली आहे. न्यूड मेकअप आणि डार्क ब्राऊन लिपस्टिकमध्ये ती अधिकच आकर्षक दिसत आहे. या लूकमध्ये तिचे हावभाव घायाळ करणारे आहेत. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “कधीकधी उत्स्फूर्त नसलेली, पूर्व तयारी नसलेली घटना मूळ क्षमतेची संभाव्यता प्रकट करते.” (Rubina dilaik share her hot and bold photos on social media)
तिचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तिचे चाहते या फोटोवर जोरदार प्रतिसाद दर्शवत आहेत. हार्ट ईमोजी, फायर ईमोजी पोस्ट करून सगळेजण तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत.
रुबीनाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘छोटी बहू’, ‘ससुराल सिमर का’, ‘शक्ती : अस्तित्व के एहसास की’, ‘सास बिना ससुराल’, ‘इश्क में मरजावा’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच याआधी रुबीनाचे ‘मरजानीया’ आणि ‘गलत’ हे गाणे रिलीझ झाले होते. मरजानिया गाण्यात ती तिचा पती अभिनव शुक्लासोबत दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राजकुमार राव- राधिका आपटे नेटफ्लिक्सवर झळकणार एकत्र; ‘मोनिका ओ माय डार्लिंग’चा पहिला लूक आला समोर