Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘आपल्या दोघांबद्दल कोणाला काही सांगू नकोस शालू’, चाहत्याच्या कमेंटवर राजेश्वरीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

कलाकारांसाठी सोशल मीडिया हे त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधण्याचे एक प्रभावी साधन आहे. चाहते आपल्या आवडत्या कलाकारांबाबत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. कलाकार त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांची माहिती सोशल मीडियावर देत असतात. चाहते देखील कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय असतात. यात अभिनेत्री राजेश्वरी खरातचे चाहते हे सोशल मीडियावरील सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या युजरपैकी एक आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर ते भरभरून प्रेम दर्शवत असतात. अशातच राजेश्वरीचे चाहते पुन्हा चांगलेच चर्चेत आले आहेत. राजेश्वरीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

राजेश्वरी खरातने तिच्या अधिकृत फेसबुक पेजवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, राजेश्वरीने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि शॉर्ट परिधान केले आहेत. तसेच तिने हातात मोबाईल घेतला आहे. या फोटोमध्ये ती नेहमी प्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आनंद क्षण आयुष्यभर टिकू शकेल जेव्हा आपण आपल्या हसण्याबाबत विचार करत असतो.” (Rajeshwari kharat’s fan give a comment on her photo, photo viral on social media)

https://www.facebook.com/Rajeshwariofficial/posts/373197690844595

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना नेहमी प्रमाणेच खूप आवडले आहेत. फोटो शेअर होतो ना होतोच चाहत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. सगळेजण प्रतिक्रिया देऊन तिचे कौतुक करत आहे. पण यातील एका युजरची कमेंट चांगलीच लक्षवेधी ठरतं आहे. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “आपल्या दोघांच्याबद्दल कोणाला सांगू नकोस शालू.” यावर राजेश्वरीने देखील रिप्लाय केला आहे की, “तू आहेस कोण?? सहसा राजेश्वरी कधी रिप्लाय देत नाही. पण या कमेंटवरील राजेश्वरीचा रिप्लाय चांगलाच प्रसिद्ध होत आहे.

राजेश्वरीला तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काहींना तिचा अंदाज आवडतो तर काहींना आवडत नाही. परंतु चुकीच्या कमेंटला राजेश्वरीने सडेतोड उत्तर देखील दिले आहे.

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या एकाच चित्रपटाने तिला भरभरून ओळख दिली. त्यानंतर तिने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिने तिच्या ‘रेड लाईट’ या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्युटी इन ब्लॅक!’ सोनाक्षी सिन्हाच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर लावली आग; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकला मिळतेय पसंती

-प्रेग्नंसीच्या चर्चांमध्ये नेहा कक्करचा मोठा निर्णय; या कारणामुळे ‘इंडियन आयडल’च्या फिनालेमध्येही नाही दिसणार गायिका

-राजकुमार राव- राधिका आपटे नेटफ्लिक्सवर झळकणार एकत्र; ‘मोनिका ओ माय डार्लिंग’चा पहिला लूक आला समोर

हे देखील वाचा