मागील बऱ्याच दिवसांपासून शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा ही दोन नाव सतत कानावर पडत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून त्यांचा प्रसार करत असल्याच्या आरोप राजवर आहे. या प्रकरणामध्ये चौकशी सुरु असतानाच आता मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीला अजूनपर्यंत क्लीन चीट देण्यात आलेली नाही, असे सांगितले जात आहे. आता शिल्पा आरोपी असली काय आणि नसली काय तिचे या वादात नाव आले आहे. शिल्पाची या प्रकरणात पोलिसांनी चौकशी देखील केली आहे. हे पहिल्यांदा नाही झाले की शिल्पाचे नाव वादात अडकले. याआधी देखील शिल्पा बऱ्याच वादांमध्ये अडकली आहे. आज आपण या लेखामधून तिच्या काही वादांबद्दल जाणून घेणार आहोत.
रियॅलिटी शो ‘बिग ब्रदर’
शिल्पा शेट्टी २००७ मध्ये ब्रिटीश रियॅलिटी शो ‘बिग ब्रदर’चा भाग होती. त्यावेळी रियॅलिटी टीव्ही स्टार जेड गुडी आणि इतर लोकांनी तिच्यावर भेदभाव केल्याचा आरोप लावला होता. तेव्हा हा विषय बराच वादग्रस्त ठरला होता. भारत आणि ब्रिटीशमध्ये यावर बऱ्याच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याच प्रकरणामुळे लोकांनी शिल्पाला भरभरून मतं देत या शोची विजेती बनवले होते. (shilpa shetty most scandalous controversies)
रिचर्ड गेर वाद
शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गेर यांच्यात २००७ साली झालेल्या एका घटनेने शिल्पाला मोठ्या वादाला सामोरे जावे लागले होते. हॉलिवूड अभिनेते रिचर्ड गेर एड्स आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी भारतात आले होते. एका इव्हेंट दरम्यान त्यांनी सार्वजनिक ठिकाणी शिल्पाला किस केले होते. शिल्पाने सांगितले की, तिला काही समजायच्या आतच ही घटना घडली.
बोल्ड फोटोशूट
शिल्पाने २००६ साली एका मासिकासाठी बोल्ड फोटोशूट केले होते. तेव्हा ती विवाहित नव्हती. हे फोटोशूट केल्यामुळे शिल्पाच्या विरोधात मदुराई कोर्टाने वॉरंट देखील काढला होता.
पुजारीसोबत झालेला वाद
शिल्पा शेट्टी २००९ साली उडिसाच्या साक्षीगोपाल मंदिरात पोहचली होती. या मंदिरात एका पुंजाऱ्याने तिला बळजबरी गालावर किस केले होते. हा मुद्दा खूपच गाजला आणि शिल्पावर खूप टीका देखील झाली होती. तेव्हा शिल्पाने ते पुजारी माझ्या वडिलांच्या वयाचे होते असे सांगितले होते.
आयपीएल सट्टा
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी आयपीएलमध्ये टीम खरेदी केली होती, त्यांच्या टीमचे नाव होते ‘राजस्थान रॉयल्स.’ या टीमने आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केल्यावर राज कुंद्रावर मॅच फिक्सिंगचे आरोप लागले होते. राज सात अशा सट्टेबाजांच्या संपर्कात होता, ज्यांनी त्यांच्या टीमवर सट्टा लावला होता. यावेळी शिल्पा देखील चर्चेत आली होती.
कौटुंबिक वाद
राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीने कविताने तिचे आणि राज कुंद्राचे लग्न तुटण्यासाठी शिल्पाला जबाबदार धरले होते. तिने तिच्या आणि राजच्या घटस्फोटावेळी हे सांगितले होते. राजचा घटस्फोट झाल्यानंतर शिल्पाने राजसोबत लग्न केले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-