Thursday, January 29, 2026
Home बॉलीवूड अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ ‘या’ तारखेला चित्रपटगृहात होणार रिलीझ

अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ ‘या’ तारखेला चित्रपटगृहात होणार रिलीझ

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम चित्रपटसृष्टीवर देखील बऱ्याच अंशी झाला आहे. अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत थिएटर मालकांना देखील मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले गेले आहेत. नुकतेच दिल्ली शासनाने ५०% क्षमतेने थिएटर चालू करण्याची परवानगी दिली आहे. जे निर्माते चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघते होते त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. अशातच महाराष्ट्रात देखील चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे.

अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजेच अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. तरण आदर्श यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “अधिकृतरित्या ‘बेल बॉटम’ हा चित्रपट १९ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.”

काही दिवसांपूर्वी हा चित्रपट २७ जुलैला प्रदर्शित होण्याची माहिती आली होती. पण आता ही नवीन तारीख समोर आली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार हा मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. (Akshay Kumar’s bell bottam movie release soon in theatre)

या चित्रपटात अक्षय कुमारसोबत हुमा कुरैशी, वाणी कपूर, लारा दत्त, अनिरुद्ध दवे हे कलाकार असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक रणजीत तिवारी हे आहेत. असिम अरोरा आणि परविझ शेख यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. अक्षय कुमारचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याचे सगळे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयाच्या चौथ्या वर्षी गायनाला सुरूवात करणाऱ्या सोनूने अभिनयातही आजमावलाय हात; वाचा त्याचा सुरेल प्रवास

-‘मनमोहिनी आज पाहिली…’, म्हणत कोणाच्यातरी विचारात गुंग झालाय स्वप्नील जोशी

-‘अश्रू आणि घाम दोन्हींमध्ये मीठ असतं, पण…’ अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट इंटरनेटवर व्हायरल

हे देखील वाचा