Tuesday, January 27, 2026
Home मराठी कहर! बॉलीवूड सिनेमातील पाच असे बोल्ड किसिंग सीन्स, ज्यामुळे थेअटर बाहेर लागले होते हाऊसफुल्लचे बोर्ड

कहर! बॉलीवूड सिनेमातील पाच असे बोल्ड किसिंग सीन्स, ज्यामुळे थेअटर बाहेर लागले होते हाऊसफुल्लचे बोर्ड

भारतीय सिनेमा काळाबरोबर अधिक बोल्ड झाला आहे. चित्रपटांमध्ये किसिंग सीन चित्रीकरण करणे आजच्या घडीला अगदी सामान्य गोष्ट आहे. पण पूर्वीच्या काळी म्हणजेच ६० ते ७०च्या दशकापर्यंत नायक आणि नायिका जवळ आल्यानंतर पडद्यावर दोन फुलं एकत्र येताना दाखवली जायची. मात्र कालांतराने हळू हळू चित्र बदलू लागलं. सिनेमांमध्ये नायक आणि नायिकांमध्ये किसिंग सिन चित्रित केले जाऊ लागले. हळू हळू निर्मात्यांचं आणि दिग्दर्शकांचं धारिष्ट्य वाढत गेलं. कथेची गरज म्हणून जर नायक आणि नायिकेचा बोल्ड सिन असेल तर तो देखील चित्रित केला जाऊ लागला आणि आता तर काय एखाद्या चित्रपटांमध्ये बोल्ड सिन चित्रित करणं हे देखील सामान्य झालं आहे. परंतु, अजूनही असे बरेच कलाकार आहेत जे आपल्या सह-कलाकारांना पडद्यावर किस करत नाहीत. त्याचबरोबर काही कलाकार असे आहेत ज्यांची ओळख किसिंग सीनशी संबंधित आहे. चला आज पाहुयात बॉलिवूडमधील सर्वात धाडसी किसिंग सीन्सबद्दल…

बॉबी
‘बॉबी’ या चित्रपटाने त्याकाळी तरुणाईच्या प्रेमास मोठी चालना दिली होती. या चित्रपटात ऋषी कपूर अतिशय सुंदर डिम्पल कपाडियाला किस घेताना दिसले होते आणि या जबरदस्त किसमुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटात बरीच बोल्ड सीन्ससुद्धा शूट करण्यात आली होती.

दयावान
‘दयावान’ चित्रपटातील माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्यातील किस ही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कीस होती. असंही म्हटलं जातं की लोक केवळ हा कीसिंग सिन पाहण्यासाठी हा चित्रपट पाहायला जात होते. मात्र त्यानंतर माधुरी आणि विनोद खन्ना यांच्यावर बरीच टीकादेखील झाली होती.

राजा हिंदुस्तानी
‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटात आमिर खान आणि करिश्मा कपूर यांनी पावसात भिजत तोपर्यंतची बॉलिवूडमधील सर्वात लांब किस केली होती. या किसने बॉलीवूडमध्ये एक वेगळी जागा निर्माण केली होती. असे म्हटले जातं की त्यावेळी एका हिंदी चित्रपटात पाहिला गेलेला हा सर्वात लांब किसिंग सीन होता. आज जरी आपल्यासाठी ही एक सामान्य बाब असली तरी त्या काळासाठी ती एक मोठी गोष्ट होती.

ख्वाहिश
‘ख्वाहिश’ चित्रपटामध्ये मल्लिका शेरावत आणि हिमांशू मल्लिक यांच्यामध्ये एकूण १७ लीपलॉक किस झाले होते. त्यावेळी बॉलिवूडमध्ये एकाच चित्रपटात इतक्या साऱ्या किसिंग सीन्सने खळबळ उडाली होती. मल्लिकाने २००३ मध्ये ‘ख्वाहिश’ या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

आशिक बनाया आपने
‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटात बॉलिवूडचा सीरियल किसर इमरान हाश्मीने ब्युटी क्वीन तनुश्री दत्ताला बराच वेळ किस केलं होतं. इमरान हाश्मी जरी फक्त बॉलिवूडमध्ये त्याच्या कीससाठी ओळखला जात असला तरी या किसची बातच काही वेगळी होती. आशिक बनाया आपने या चित्रपटाच्या बोल्ड गाण्यानंतर तनुश्रीची प्रतिमा देखील एक बोल्ड अभिनेत्री अशीच बनली होती.

आपल्याला या किसिंग सीन्स बद्दल आता काहीच वाटत नसेल, कारण बॉलिवूड मध्ये आता याहीपेक्षा बोल्ड पद्धतीने किसिंग सीन्स चित्रित केले जातात. परंतु ज्या काळात हे चित्रपट प्रदर्शित झाले होते त्यावेळेचा भारतीय प्रेक्षकही वेगळा होता. त्यामुळे किस ही एका जोडप्यामध्ये होणारी वैयक्तिक बाब त्यांना चित्रपट गृहांमध्ये सर्वांसोबत ७० एमएमच्या पडद्यावर दिसणं ही क्रांतिकारी बाब वाटायची.

हे देखील वाचा