बॉलिवूडमधील सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर होय. आपल्या साध्या वेशभूषेत ती सगळ्यांचे मन जिंकून घेते. खासकरून पारंपरिक पद्धतीचा पोशाख ती परिधान करत असते. तिची आणखी एक ओळख म्हणजे घनदाट कुरळे केस. त्यामुळे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात तिच्या चाहत्यांकडून प्रेम मिळत असतं. पण आता नुकतेच मिथिलाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक बोल्ड फोटोशूट करताना व्हिडिओ शेअर केला आहे. तिला या अशा लूकमध्ये पाहून सगळे चाहते खूपच हैराण झाले आहेत
मिथिला पालकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती फोटोशूट करताना दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा सूट परिधान केला आहे. यामध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. या व्हिडिओओमध्ये अत्यंत बोल्ड पोझ देताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर तिचे चाहते सातत्याने कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करताना दिसत आहे. तसेच अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर यांनी कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक केले आहे. (Mithila palkar’s bold photoshoot video viral on social media)
मिथिलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती मागील काही दिवसात ‘त्रिभंगा’ या चित्रपटात काजोलसोबत स्क्रीन शेअर करत होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला भरभरून दाद मिळाली होती.
सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी मिथिला ही एक आहे. मिथिलाने तिच्या करिअरची सुरुवात ‘वरुण नार्वेकर’ यांच्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटातून केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांनी काम केले आहे. यासोबतच तिने २०१४ मध्ये ‘माझा हनिमून’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.
तिने २०१८ मध्ये इरफान खानसोबत ‘कारवां’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील या दोघांच्या आंबट गोड केमिस्ट्रीने सगळ्यांना खूप हसवले, तसेच भावनिक देखील केले. तसेच तिने ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मेहंदी लगा के रखना’ गाण्याचं इंग्लिश व्हर्जन ऐकून प्रियांका चोप्रा झाली लोटपोट! तुम्ही ऐकलं का?
-‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे!’, शालूच्या फोटोने पुन्हा उडवली चाहत्यांची झोप
-पारदर्शी साडीतील ‘तो’ सीन अन् दाऊदसोबतचे नाते, जाणून घ्या मंदाकिनीबद्दल ‘या’ गोष्टी










