Wednesday, January 21, 2026
Home बॉलीवूड मलायका अरोराचे चालणे बघून युजर झाले हैराण; काहींनी उडवली खिल्ली, तर काहींनी लावला अपघाताचा अंदाज

मलायका अरोराचे चालणे बघून युजर झाले हैराण; काहींनी उडवली खिल्ली, तर काहींनी लावला अपघाताचा अंदाज

बॉलिवूडमध्ये अनेकवेळा लग्न झाल्यानंतर किंवा मूलं झाल्यानंतर अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून तसेच त्यांच्या करिअरपासून दूर जातात. तसेच त्यांच्या फिटनेसकडे देखील त्या योग्य ते लक्ष देत नाही. पण बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही मात्र या विधानास अपवाद आहे. वयाच्या ४० व्या वर्षी देखील तिचे सौंदर्य आणि फिटनेस तसाच आहे. तिच्याकडे बघून कोणीही म्हणणार नाही की, तिला एक मुलगा आहे. ती सध्या चित्रपटात काम करत नसली तरी सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकतीच मलायका ही विमानतळावर स्पॉट झाली आहे. तिचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर सोशल मीडिया युजर्स तिला खूप ट्रोल करत आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या चालण्याची थट्टा उडवललेली पाहायला मिळाली.

मलायका अरोराचा हा व्हिडिओ व्हायरल भयानीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमधील तिचे चालणे पाहून युजरने तिला खूप ट्रोल केले आहे. सगळे हा विचार करत आहेत की, तिची चाल एवढी कशी काय बदलली आहे. (Malaika Arora troll for her look nad moves, users says some bad accident seems to happen)

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मलायकाने रिप्ड जीन्स, शॉर्ट टॉप आणि त्यावर लाँग लाल रंगाचे जॅकेट घातले आहे. अनेकांना तिची ही स्टाईल अजिबात आवडली नाही. या नंतर अनेकांनी तिच्या या लूकवर आणि स्टाईलवर खूप खिल्ली उडविली आहे. खासकरून तिची जिन्स पाहून तर सगळ्यांना खूप हसायला आले आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, “अस वाटतंय ऑटोला लटकून आली आहे. त्यामुळेच कदाचित जीन्स फाटली आहे आणि चाल बदलली आहे.”

काही युजर्सने तिच्या चालण्यावरून तिला ट्रोल केले आहे. यावर एका युजरने कमेंट करून लिहिले आहे की, “कायतरी वाईट अपघात झालेला दिसतोय.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “मलायका तर खूप ग्रेस्फुल चालते मग हिला काय झालं?” अनेकजण तिच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.

मलायका अरोरा ही पुन्हा एकदा एक शो जज करणार आहे. ज्या शोचे नाव ‘सुपर मॉडेल ऑफ द इअर सिझन २’ हे असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा