Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड अफेयर्सच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियारा आडवाणीला ‘असं’ केलं बर्थडे विश; अभिनेत्री म्हणाली…

अफेयर्सच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियारा आडवाणीला ‘असं’ केलं बर्थडे विश; अभिनेत्री म्हणाली…

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री कियारा आडवाणी ही आज शनिवारी (३१जुलै) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. कियाराचा जन्म ३१ जुलै १९९२ साली मुंबई येथे झाला आहे. तिच्यासाठी हा वाढदिवस खूप खास आहे. कारण लवकरच तिचा ‘शेरशाह’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा तिचा को-स्टार आहे. तिच्या वाढदिवशी तिच्या अनेक चाहत्यांनी तसेच अनेक बॉलिवूड कलाकारांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यातच सिद्धार्थ मल्होत्राने देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा कियाराचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “हॅप्पी बर्थडे कियारा‌, तुझ्यासोबत शेरशाहचा प्रवास खूप चांगला होता. यासोबत अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. खुश राहा. खूप सारं प्रेम.” सिद्धार्थची ही पोस्ट कियाराला खूपच आवडली आहे. तिने ही पोस्ट तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला शेअर करून लिहिले आहे की, “थॅंक यू कॅप्टन.” यासोबतच तिने एक हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. (Siddharth Malhotra wishes Kiara adwani on her birthday and actress reply thank you captain)

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्यांचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्साहित आहेत. त्यांच्या जोडीला खूप प्रेम मिळत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रासोबत कियारा देखील त्यांच्या या चित्रपटाची खूप वाट बघत आहे. हा चित्रपट कारगिल युध्दातील कॅप्टन विक्रम बत्रा याच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात सिद्धार्थ कॅप्टन विक्रमची भूमिका निभावणार आहे. सिद्धार्थ आणि कियारा दोघेही सोशल मीडियावर त्यांच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट १२ ऑगस्ट २०२१ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा