Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ‘दबंग’ने सावरले होते अरबाजचे करिअर, लग्नाच्या १८ वर्षांनंतर घेतला होता मलायकापासून घटस्फोट

‘दबंग’ने सावरले होते अरबाजचे करिअर, लग्नाच्या १८ वर्षांनंतर घेतला होता मलायकापासून घटस्फोट

आज जर आपण पाहिले, तर बॉलिवूडमध्ये अनेक बहीण- भावांच्या जोड्या काम करत आहेत. काही अपवाद सोडले, तर जवळपास सर्वच जोड्यांपैकी एक हिट तर एक फ्लॉप झाली आहे. अशी बरीच उदाहरणं आपल्याला दिसतील. असेच एक मोठे उदाहरण म्हणजे सिनेसृष्टीतील अतिशय दिग्गज आणि मानाचे असणारे खान कुटुंब सर्वानाच माहित असेल, नाही का? ते कुटुंब म्हणजेच सलीम यांचं खान कुटुंब. त्यांच्या कुटुंबातील सर्वच जणं या ना त्या मार्गाने चित्रपट जगताशी जोडले गेले आहेत. सलीम खान यांचे तिन्ही मुलं सलमान, अरबाज आणि सोहेल देखील अभिनयाच्या क्षेत्रात आणि सोबतच इतर क्षेत्रात कार्यरत आहेत. या घरातील मोठा मुलगा सलमान खान सोडला, तर दोघेही अभिनयात काही यशस्वी झाले नाहीत. मात्र, या दोन भावांनी निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात चांगलेच यश मिळवले. अरबाजने मुख्य भूमिका नाही तर सहायक भूमिकेत देखील यश मिळवले. अरबाज त्याच्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील ओळखला जातो.

बुधवारी (४ ऑगस्ट) अरबाज खान त्याचा ५४ वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये काम करायचे म्हटल्यावर सगळ्यांनाच मुख्य भूमिका पाहिजे असते. मात्र, अरबाजने सहाय्यक भूमिकांमधून भरपूर यश मिळवले. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.

अरबाजचा जन्म ४ ऑगस्ट, १९६७ रोजी पुण्यात झाला. त्याचे वडील सलीम खान हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे आणि यशस्वी लेखक, तर आई सुशीला चरक उर्फ सलमा खान या उत्तम पेंटर. भाऊ सलमान सुपरस्टार, तर लहान भाऊ सोहेल यशस्वी निर्माता. अरबाजने देखील सलमानच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयाच्या क्षेत्रात पदाणर्प केले. त्याने १९९६ मध्ये जुही चावला आणि ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘दरार’ सिनेमातून पदार्पण केले. त्याने त्याच्या पहिल्याच चित्रपटात खलनायक साकारला. त्याचा हा खलनायक त्याला पुरस्कार देऊनही गेला. उत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार त्याला मिळाला. (arbaaj khan birthday special)

त्यानंतर १९९८ साली त्याने सलमान खानसोबत ‘प्यार किया तो डरना’ या सिनेमात काजोलच्या भावाची सहाय्यक भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्याला पुरस्कार देखील मिळाला. अरबाजने अनेकदा मोठ्या पडद्यावर सलमानसोबत अनेक भूमिका साकारल्या. अरबाजने ‘गर्व’, ‘कयामत’, ‘मालामाल विकली’, ‘शूटआऊट अँट लोखंडवाला’, ‘भागाम भाग’, ‘हॅलो ब्रदर’, ‘हलचल’, ‘फॅशन’, ‘दबंग’, ‘दबंग २’ आदी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या. मात्र, असे असूनही त्याला अपेक्षित यश मिळाले नाही.

त्याच्या करिअरसाठी सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला २०१० साली आलेला ‘दबंग’ सिनेमा. निर्माता म्हणून त्याच्या या पहिल्याच सिनेमाने बक्कळ कमाई करत, राष्ट्रीय पुरस्कारावर देखील मोहोर उमटवली. या सिनेमाची निर्मिती करत त्याने यात सहाय्यक भूमिका देखील निभावली. यासोबतच त्याने त्याचे ‘अरबाज खान प्रॉडक्शन’ हाऊस देखील सुरू केले असून, ‘त्याच्या अंतर्गत त्याने ‘दबंग २’ ची निर्मिती केली. हा सिनेमा देखील सुपरहिट झाला.

सिनेमांसोबतच तो टेलिव्हिजन क्षेत्रातही झळकला. त्याने ‘कॉमेडी सर्कस’ या शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले. सोबतच ‘पॉवर कपल’ या शोचे सूत्रसंचालन देखील केले. यासोबतच सध्या तो त्याच्या ‘पिंच’ या शोमुळे सुद्धा खूप चर्चेत आहे. या शोचा दुसरा सिझन सध्या सुरू आहे.

अरबाज सर्वात जास्त चर्चेत आला, तो त्याच्या आणि मलायकाच्या घटस्फोटामुळे. २०१७ साली या दोघांनी घटस्फोट घेतला. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या जवळीकीमुळे हा घटस्फोट झाल्याचे सांगितले जाते. पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १२ डिसेंबर, १९९८ ला अरबाज खान आणि मलायका यांनी हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिम पद्धतीने लग्न केले. २००२ साली त्यांना अरहान नावाचा मुलगा झाला. सर्व काही आलबेल असताना अचानक या दोघांनी सहमतीने घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाआधी अर्जुन आणि मलायका यांच्याबद्दल अनेक बातम्या येत होत्या. आता अरबाजचे नाव मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत जोडले जाते, तर अर्जुन आणि मलायका नात्यात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आता होणार धमाल! प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ‘या’ पाच मालिका सज्ज; लवकरच झी मराठीवर मारणार दणक्यात एंट्री

-अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट

-शिवानी सोनारला वाढदिवसाच्या आधीच मिळाले ‘हे’ गिफ्ट, पाहून तुम्हीही कराल अभिनंदन

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा