[rank_math_breadcrumb]

‘इतकी’ महागडी साडी घालून कियारा आडवाणीने केले ‘शेरशाह’चे प्रमोशन; किंमत ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे

कियारा आडवाणीने एका फ्लॉप चित्रपटापासून तिच्या करियरची सुरुवात केली. मात्र दुसरी संधी मिळताच तिने त्या संधीचे सोने केले आणि हिट अभिनेत्रीचा ताज मिळवला. अगदी थोड्याच कालावधीमध्ये तिने तिची ओळख आणि मोठा फॅनक्लब तयार केला आहे. कियारा लवकरच तिच्या आगामी ‘शेरशाह’ या सिनेमात दिसणार असून, हा सिनेमा १२ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनवेळी कियाराने जो लूक तरी केला होता, त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

कियारा नेहमी तिच्या स्टाइलमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. ती जेवढी सुंदर आहे, तेवढीच स्टायलिश असून ती तिच्या प्रत्येक लूकमध्ये बोल्ड आणि सुंदर दिसतेच दिसते. कियाराने तिच्या नुकत्याच कॅरी केलेल्या एका लूकचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. कियाराने या फोटोमध्ये हिरव्या रंगाची साडी आणि बॅकलेस ब्लाउज घातला आहे. तिची ही साडी ऑर्गेंजा फॅब्रिकची असून दिसायला ती अगदी लाइटवेट आणि आकर्षक दिसत आहे. (kiara advani beautiful organza saree worth 48k)

कियाराने नेसलेल्या साडीवर खालच्या बाजूला इंट्रीकेट एंब्रॉइडरी दिसत असून, पांढऱ्या रंगाच्या दोऱ्याने खालच्या बाजूला हेवी कढाईवर्क केले असून, साडीचा पदरही इंट्रीकेट एंब्रॉइडरीने भरलेला आहे. या साडीसोबत तिने फ्लोरल पॅटर्नचे स्लिव्हलेस ब्लाउज घातले असून, या ब्लाउजवरील फुलांचे मोटिफ्स त्या ब्लाऊजला अधिक सुंदर बनवत आहे.

कियाराच्या ऍक्सेसरीजबद्दल सांगायचे झाले, तर तिने हातात गुलाबी बांगड्या, कानात सिल्वर झुमके
आणि रिंग्स घातली आहे. सोबतच तिने साधा मेकअप केसांचा जुडा आणि त्यावर तिने लावलेली छोटी टिकली तिचा लूक पूर्ण करत आहे. तिचा हा इंडियन लूक सर्वांनाच आवडत असून, त्यावर फॅन्स आणि कलाकारांच्या कमेंट्स देखील येत आहे.

या साडीच्या किंमतीबद्दल सांगायचे झाले, तर ही साडी तोरानी लेबलच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्हाला घेता येईल. साडीची किंमत ४८,५०० रुपये इतकी आहे. ही साडी सर्वांनाच घेता येईल असे नाही, मात्र ज्यांना शक्य आहे ते नक्कीच कियाराचा लूक आणि तिची साडी ट्राय करू शकतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आता होणार धमाल! प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ‘या’ पाच मालिका सज्ज; लवकरच झी मराठीवर मारणार दणक्यात एंट्री

-अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट

-शिवानी सोनारला वाढदिवसाच्या आधीच मिळाले ‘हे’ गिफ्ट, पाहून तुम्हीही कराल अभिनंदन