या दिवसात बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान. करीना कपूरने ९० च्या दशकात चित्रपटसृष्टी गाजवली आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे तिची लोकप्रियता आणि चाहता वर्ग देखील तेवढाच मोठा आहे. पण तिचे लग्न झाल्यांनतर तिचा चित्रपटसृष्टीतील वावर कमी झालेला दिसून आला आहे. याहूनही करीना तिच्या प्रेग्नेंसीमुळे खूप चर्चेत राहिली आहे. तिचा पहिला मुलगा तैमूर अली खान हा तर स्टारकिडपैकी एक लोकप्रिय स्टारकिड आहे. लहानपणापासूनच तो मोठ्या प्रमाणात लाईमलाईटमध्ये आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. तिने अजूनही तिच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा प्रेक्षकांना दाखवला नाही. कारण तिला वाटते की, तिचा हा मुलगा तैमूरप्रमाणे लाईमलाइटमध्ये येऊ नये. करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव जेह असे ठेवले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी तिने तिचे ‘करीना कपूर खान्स प्रेग्नेंसी बायबल’ हे पुस्तक प्रदर्शित केले आहे. या पुस्तकात तिने तिच्या प्रेग्नेंसीमधील सगळा प्रवास कथन केला आहे. हे पुस्तक आता विक्रीसाठी तयार आहे. या पुस्तकात तिने तिची पहिली प्रेग्नेंसी तसेच दुसरी प्रेग्नेंसी यामधील सगळा अनुभव शेअर केला आहे. या पुस्तकाच्या नावावरून ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. तिने तिच्या पुस्तकाला बायबल हे नाव देऊन ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याचा तिच्यावर आरोप केला होता. (kareena kapoor khan shear her second son jeh’s photo social media)
अशातच करीनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या दोन्ही मुलांचा फोटो शेअर करून या पुस्तकाबाबत काही माहिती दिली आहे. करीनाने एक कोलाज फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका बाजूला करीना तैमूरसोबत आहे तर दुसऱ्या बाजूला ती तिचा दुसरा मुलगा जेहसोबत दिसत आहे. पण तिने जेहच्या चेहऱ्यावर इमोजी ठेवली आहे. त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नाहीये. हा फोटो शेअर करून तिने “माझी ताकद, माझं जग आणि आणि माझा अभिमान” असे कॅप्शन दिले आहे. तिने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अबब! चक्क ‘इतका’ महागडा ड्रेस घालून वाणी कपूर पोहचली ‘बेलबॉटम’ सिनेमाच्या प्रमोशनला










