बॉलिवूडमध्ये कलाकार जेवढे लोकप्रिय असतात तेवढेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त लोकप्रिय स्टारकिड असतात. कलाकारांपेक्षा जास्त ग्लॅमर त्यांच्या मुलांमध्ये पाहायला मिळतो. अशातच स्टारकिडमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असणारी स्टारकिड म्हणजे अभिनेता जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ. बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच कृष्णा देखील चर्चेत असते. ती देखील तिचा भाऊ टायगर श्रॉफ प्रमाणे फिटनेसच्या बाबत खूप काटेकोरपणे लक्ष देते. तिचे जिममधील फोटो आणि व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचा फिटनेस पाहून भल्या भल्या अभिनेत्री गार पडतात. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने अत्यंत हॉट आणि बोल्ड पोझ देत फोटो शेअर केले आहेत. (krishna shroff share her sizzling potos on social media)
कृष्णाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि शॉर्ट स्कर्ट परिधान केला आहे. यावर गुलाबी रंगाची नक्षी आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच बोल्ड पोझ देताना दिसत आहे. या लूकमध्ये तिचा फिटनेस पाहण्यासारखा आहे. हा फोटो तिच्या चाहत्यांना तसेच अनेक कलाकरांना देखील खूप आवडला आहे. फोटोवर कमेंट करून सगळे तिच्या या लूकचे आणि फिटनेसचे कौतुक करत आहेत. कृष्णा श्रॉफ ही चंदेरी दुनियेपासून दूर आहे पण सोशल मीडियावर मात्र ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. याआधी देखील तिने तिचे अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
कृष्णाने काही दिवसांपूर्वी एका म्युझिक व्हिडिओमधून पदार्पण केला आहे. ‘किन्नी किन्नी वारी’ या म्युझिक व्हिडिओमध्ये तिच्यासोबत जॉनी लिव्हर त्याची मुलगी जेमी लिव्हर, जन्नत जूबैर, राज शोकर आणि तन्वी दिसत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण
-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा
-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल