मराठी मालिका या प्रेक्षकांना प्रामुख्याने आवडतात. मालिकांमधील सगळीच पात्र प्रेक्षकांना हवीहवीशी वाटतात. यातीलच कलर्स मराठीवरील सर्वांची आवडती मालिका म्हणजे ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत संजीवनी या मुख्य भूमिकेत अभिनेत्री शिवानी सोनार झळकत आहे. मालिकेतील तिचे पात्र प्रेक्षकांना प्रामुख्याने आवडत आहे. अनेक अभिनेत्रींना मागे सारून, शिवानी आता लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. शिवानीने शुक्रवारी (६ ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यानिमित्त तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर, तर अनेकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा तसेच गिफ्ट देखील दिले आहे. यातील एक गिफ्ट शिवानीला खूपच आवडले आहे. जे तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
शिवानीला शुभांगी गोखले म्हणजे या मालिकेत तिची सासू आईसाहेब यांनी एक खास गिफ्ट दिले आहे. त्यांनी तिला एक पत्र लिहिले आहे. जे शिवानीला खूप आवडले आहे. या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, “प्रिय शिवानी, तुझा वाढदिवस आहे आणि मी एक मोठं गिफ्ट दिलंय. एवढीच घटना नाहीये. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आहेतच. पण कलाकार आणि त्याहीपेक्षा सहकलाकार म्हणून तुझं हे कौतुक आहे. पुढे काम करताना हिच गोष्ट खूप कमी येणार आहे, ती तुझ्यात आहे. याचं मला फार कौतुक वाटतं. मी कुणी फार मोठी नाहीये. पण जे काही मिळवलं ते कामाशी प्रामाणिक राहून केलं. तरुण कलाकारांनीही तसं केलं की खूप आनंद होतो. तू हा आनंद खूप दिलास, देत राहशील. तू एक खूप चांगली परफॉर्मर आहेस. तुला खूप मोठी शाबासकी. माझी आठवण म्हणून ही भेट. सप्रेम, सस्नेह.”
हे पत्र शिवानीने सोशल मीडियावर पोस्ट करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आणि काय हवं ?? सगळ्यात जास्त जवळचं आणि सर्वात जास्त आवडलेलं गिफ्ट.” या सोबतच पुढच्या फोटोमध्ये शुभांगी यांनी तिला गळ्यातले, नथ आणि कानातले गिफ्ट दिलेला फोटो तिने शेअर केला आहे. यासोबत हे सगळे दागिने घालून देखील तिने फोटो शेअर केला आहे. (Marathi actress shivani sonar get a gift from special person)
वाढदिवसाच्या नुकतेच काही दिवसांपूर्वी शिवानीचे सोशल मीडियावर एक लाख फॉलोवर्स पूर्ण झाले होते. त्या निमित्त तिने सर्व फॉलोवर्सचे आभार मानले होते.
शिवानीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने या आधी ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात एक भूमिका निभावली आहे. तसेच तिने ‘पांडू’ आणि ‘अग्ली डेस्क’ या चित्रपटात देखील काम केले आहे. पण तिला ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील पात्राने खूप लोकप्रियता मिळाली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण
-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा
-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल